
*पीडितेला न्याय व आरोपीस कठोर शिक्षा मिळावी यासाठी 12 सप्टेंबरला राजेश्वर मंदिरातून भव्य रॅली*प्रभाकर मेसरे अकोला अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूच्या धाकावर बलात्कार झाल्याच्या घटनेमुळे अकोला शहर हादरले असून सर्व समाजात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाची तातडीची बैठक अकोला येथे घेण्यात आली. बैठकीत निर्णय घेण्यात आला की, शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता ग्राम दैवत राजेश्वर मंदिर जुने शहर अकोला येथून शहरात भव्य निषेध रॅली काढण्यात येईल. या रॅलीत सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोपीविरुद्ध तीव्र निषेध व्यक्त करावा, असे आवाहन करण्यात आले. बैठकीनंतर प्रशासनाला दिलेल्या निवेदनात सकल हिंदू समाजाने ठाम मागण्या मांडल्या – आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, आरोपीचे घर बुलडोझरने पाडावे, पीडितेला तातडीने शाशकीय आर्थिक व कायदेशीर मदत तसेच सुरक्षा पुरवावी आणि सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे जेणेकरून पीडितेला तातडीने न्याय मिळेल. या अमानुष घटनेमुळे समाज अस्वस्थ झाला असून, कठोर कारवाईशिवाय हिंदू समाज शांत बसणार नाही, असा इशारा या बैठकीत देण्यात आला.