
दिनांक ०६/०९/२०२५ रोजी पो.स्टे. डाबकी रोड येथे अप क. २९९/२०२५ कलम ६५ (१), ७५ (१), ३३३,३५१(२), ३५१(३), ३५२ बी.एन.एस. सहकलम ४ (२), ६(१), ८, १२ पोरको नुसार गुन्हा दाखल झाला असुन यातील फिर्यादी ही अल्पवयीन असुन गणेश विसर्जन करपे कामी फिर्यादी यांचे घरातील सर्व सदस्य श्री. गणेश विसर्जन करीता गेले असता अल्पवयीन फिर्यादी ही घरी एकटी हजर असल्याच्या संधीचा फायदा घेत आरोपी नामे तौहिदखान समीरखान बैद वय २८ वर्ष, रा खैर मोहम्मद प्लॉट, डाबकी रोड, अकोला याने पीडीतेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून पिडीतेला चाकुचा धाक दाखवत जबरीने लैगिंक अत्याचर केला, या बाबत फिर्यादीचे जबानी रिपोर्टवरून पो रटे डाबकी रोड येथे गुन्हा दाखल करून तपासात घेतला होता.> घडलेल्या गुन्हयाचे गांभीर्य पाहता मा. पोलीस अधीक्षक सा. अकोला श्री. अर्चित चांडक यांनी मा. पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्था.गु.शा. अकोला. यांना आरोपी याचा शोध घेउन तात्काळ अटक करपे कामी पथक तयार करण्याचे आदेश दिले वरून पोलीस निरीक्षक श्री. शंकर शेळके, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनात पो. रटे. डाबकी रोड व स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे चार पथक तयार करून विविध ठिकाणी व वेगवेगळ्या राज्यात आरोपी शोध घेण्यासाठी स्वाना करण्यात आले.> गठीत केलेल्या स्था.गु.शा. अकोला पथक यांना आरोपी हा सुरत येथे जाणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती वरून मा. पोलीस अधीक्षक सा. श्री. अर्चित चांडक यांचे आदेशाने व पोलीस निरीक्षक स्था. गु. शा. श्री. शंकर शेळके यांचे मार्गदर्शनात एक पथक तात्काळ स्वरूपात सुरत, गुजरात राज्य येथे खाना करण्यात आले. स्था.गु.शा. अकोला पथक सुरत येथे पोहचुन आरोपी यावे नातेवाईकांकडे जाउन शोध घेतला असता आरोपी याने त्याचे जवळ असलेला मोबाईल त्याचे बहिणीचे घरी सोडुन तेथुन निघुन गेला होता. आरोपीने वापरात असलेला मोबाईल सुरत येथे ठेवल्यामुळे त्याचा शोध घेणे आव्हानात्मक झाले होते.> स्था.गु.शा. अकोला पथकाला गुप्त माहिती प्राप्त झाली की, सदर गुन्हयातील आरोपी हा अहमदाबाद राज्य गुजरात येथे त्याचे नातेवाईकाकडे गेला आहे. वरून पथकाने विलंब न लावता तात्काळ अहमदाबाद कडे खाना होउन आरोपीचे नातेवाईकाची माहिती घेउन त्यांच्या घरी पोहचुन आरोपीबाबत विचारपुस केली असता आरोपी हा अहमदाबाद येथे आला होता व तेथुन निघुन गेला असे माहिती प्राप्त झाली. सदर पथकाने गव्हयातील आरोपीबाबत तांत्रीक माहिती काढली असता नमुद आरोपी हा आग्रा (उत्तरप्रदेश) येथे गेल्याचे निष्पन्न झाले परंतु अहमदाबाद ते आग्रा हे अंतर जवळपास ९५० कि.मी असल्याने तात्काळ तेथे पोहचणे शक्य नसल्याने मा. पोलीस अधीक्षक साहेब यांचे आदेशाने स्था.गु.शा. अकोला पथक हे विमानाने दिल्ली येथे पोहचले व दिल्ली येथुन मिळेल त्या साथनाने आग्रा (उत्तरप्रदेश) पोहचुन आरोपीचा आग्रा येथील रेल्वे स्टेशन, बस स्टैंड, दरगाह, मंदीर, लॉजेस, आश्रम इत्यादी ठिकाणी शोध घेतला परंतु आरोपी मिळून आला नाही.> सदर गव्हयातील सराईत आरोपीने पिडीत अल्पवयीन मुलीचे आई, वडिल गणेश विसर्जनाकरीता घराबाहेर गेले असता त्या संधीचा फायदा घेउन अल्पवयीन मुलीवर चाकुचा धाक दाखवुन लैगीक अत्याचार केल्यामुळे समाजामध्ये संतापाची लाट पसरली होती, तसेच विविध संघटनाने आरोपीस तात्काळ अटक करण्याकरीता मोर्चाचे आयोजन केले होते. तसेच आरोपीचे हातपाय व लिंग कापणा-याला बक्षिस घोषित केले होते व इतर सोशल मिडीया व समाज माध्यमच्या आधारे अकोला जिल्हयाचे वातावरण तणाव पुर्ण झाले होते. गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधीक्षक सा. श्री. अर्चित चांडक यांनी आरोपीच्या मागावर असलेल्या स्था. गु.शा. अकोला पथकाला आरोपीचा कोणत्याही परीस्थितीमध्ये लवकरात लवकर शोथ घेवुन अटक करण्याचे आदेश दिले होते.> गुन्हयातील आरोपीचे हालचालीचे तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी हा रेल्वे व बस ने सतत प्रवास करून १) भुसावळ (महाराष्ट्र), २) सुरत (गुजरात), ३) अहमदाबाद (गुजरात), ४) दिल्ली ५) आग्रा (उत्तरप्रदेश), ६) झांसी (उत्तरप्रदेश), ७) भोपाळ (मध्यप्रदेश) ८) गुना (मध्यप्रदेश), ९) ललीतपुर (उत्तरप्रदेश), १०) शिवपुरी (मध्यप्रदेश) ११) उज्जैन (मध्यप्रदेश) १२) देवास (मध्यप्रदेश) १३) इंदौर (मध्यप्रदेश) या मार्गावर प्रवास करत होता. प्रत्येक ठिकाणी रथा. गु.शा. अकोला पथक हे रेल्वे स्टेशन व बस स्टैंड, दर्गा, मंदीर, लॉजेस, इत्यादी ठिकाणी चेक करत होते. परंतु आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने मिळुन येत नव्हता.> स्था.गु.शा. अकोला पथक हे भोपाळ (मध्यप्रदेश) येथे आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणाव्दारे माहिती प्राप्त झाली की, सदरगुन्हयातील आरोपी हा इंदौर (मध्यप्रदेश) बायपास येथे असल्याचे समजले वरून स्था. गु.शा. अकोला येथील स.पो.नि. गोपाल ढोले व अंमलदार शेख हसन, एजाज अहेमद, मोहम्मद आमीर यांचे पथक खाजगी वाहन करून तात्काळ इंदौर येथे पोहचुन वैषांतर करून आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा इंदौर बायपास येथे असल्याचे समजल्याने आरोपीस अटक करण्याकरीता मोठ्या शिताफीने सापळा रचुन त्यास अटक करण्यात यश प्राप्त केले.> सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी स्था. गु.शा. अकोला पथकाने मागील चार दिवसात चार चाकी वाहन, विमान, रेल्वे, ऑटो, बस अशा प्रकारे मिळेल ल्या साधानाने अंदाजे ५००० कि. मी अहोरात्र प्रवास करून तसेच जवळपास २५० सिसिटीवी फुटेज चेक करून व एकुण १२ ट्रेन वेगवेगळ्या राज्यात चेक करून अथक मेहनत करून आरोपीस पकडण्यास यश मिळवीले.> आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने आरोपीस अटक करणे आव्हानात्मक होते.> आरोपीचा कोणताही ठाव ठिकाण नसल्याने आरोपी अटक करणे अवघड होते. त्यामुळे सदर प्रकरणाचे गांभीर्य मा. श्री. अर्चित चांडक सा. यांनी पोलीस निरीक्षक स्था.गु. शा. श्री. शंकर शेकळे यांचे नेतृत्वात एकुण १० अधिकारी व एकुण ४० अमंलदार आरोपीचा शोध घेणे कामी नियुक्त केले होते.> आरोपी मागील ४ ते ५ दिवस कोठेही न थांबता रेल्वे, बस व मिळेल त्या वाहनाने रात्रंदिवस प्रवास करून फरार राहण्याचा प्रयत्न करत होता.> सदर गुन्हयातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर अकोला शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये खालील प्रमाणे गुन्हेदाखल असुनअ.क्र.पोलीस स्टेशनअप.क्र. व कलमसिटी कोतवालीअप क. १९४/२०१६ कलम ३७९,३४ भा.दं. वि.२डाबकी रोडअप क्र. १०१/२०२० कलम ३२४, ५०४,५०६ ३४ भादवी३डाबकी रोड४अप क्र. ५२६/२०२१ कलम ३७६ (२), २९४,५०६ भादवी, सह. ४, २५सिटी कोतवाली५अप क. २२७/२०२२ कलम ३७९ भादवीरामदासपेठ६अप क. ११०/२०२५ कलम ११५ (२),१३७ (२), ३५१ (२) (३),२९६, भा.न्या.सं. ४,६,८,१० पोस्कोडाबकी रोडअप क. २९९/२०२५ कलम ११५ (२),१३७ (२), ३५१ (२) (३),२९६, भा.न्या.सं. ४,६,८,१० पोरकोसदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चित चांडक सा, जि. अकोला, मा. अपर पोलीस अधिक्षकश्री बी. चंद्रकांत रेड्डी सा, जि अकोला, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. शंकर शेळके सा. स्थानिक गुन्हे शाखा अकोला व स्था.गु.शा. येथील स.पो.नि. विजय चव्हाण, गोपाल ढोले, पो.उप.नि. गोपाल जाथय, माजीद पठाण, विष्णु बोडखे व पो. अमंलदार दशरथ बोरकर, शेख हसन, फिरोज खान, अब्दुल माजीद, वसिमोद्दीन, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, किशोर सोनोने, भास्कर थोत्रे, गोकुळ चव्हाण, उमेश पराये, सुलतान पठाण, खुशाल नेमाडे, एजाज अहेमद, श्रीकांत पातोंड, राहुल गायकवाड, मोहम्मद आमीर, आकाश मानकर, राज चंदेल, धिरज वानखडे, अभिषेक पाठक, स्वप्नील खेडकर, अन्सार अहेमद, स्वप्नील चौधरी अशोक सोनवणे, सतिश पवार,, प्रशांत कमलाकर, तसेच सायबर शाखेचे पो.अं. गोपाल ठोंबरे, आशिष आमले, राहुल सानप, स्वप्नील दामोदर, गणेश कुहिले यांनी केली.