ईद मिलादुननबी च्या मिरवणुकीमध्ये औरंगजेब, इब्राहीम गाझी यांचे पोस्टरवर दुग्धाभिषेक व जलाभिषेक करून शहरातील शांतता व ऐकोप्याला बाधा निर्माण करणारे आरोपीतांविरूध्द कायदेशीर कार्यवाही

0
42

दि. ०९/०९/२०२५ रोजी अकोला शहरात ईद मिलादुननबी निमीत्त काढण्यात आलेल्या मिवरणुकीमध्ये अंदाजे ०८ ते १० ईसमांनी बियाणी चौक, अकोला येथे औरंगजेब, इब्राहीम गाझी यांचे पोस्टरवर दुग्धाभिषेक व जलाभिषेक करून त्याचा व्हिडीओ तयार करून जाणीवपुर्वक धार्मीक भावना दुखाविल्याने तसेच त्यांचे अशा कृत्यामुळे शहरातील शांतता व ऐकोप्याला बाधा निर्माण झाल्याने व मिरवणुक मार्गाव्यतिरीक्त जावुन मा. जिल्हाधिकारी यांचे आदेशाने उल्लंघन केल्याने सदरचे ०८ ते १० अनोळखी ईसमांविरूध्द पो.स्टे. सिटी कोतवाली, अकोला येथे अप कं २५८/२०२५ कलम १९६, ३(५) भारतीय न्याय संहिता सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेच्या प्राप्त व्हिडीओच्या सहाय्याने सदर गुन्हयातील अनोळखी आरोपीतांचा शोध घेवुन आरोपी नामे १) सैय्यद शारीक सैय्यद जमीर, वय २७ वर्षे रा. जमजम पार्क, गंगानगर, अकोला २) शेख आसीफ शेख अलताफ, वय २७ वर्षे रा. हमजा प्लॉट, जुने शहर, अकोला ३) मोहीन खान मतीन खान, वय २७ वर्षे रा. मॉडर्न शाळेजवळ, गंगानगर, अकोला यांना सदर गुन्हयात निष्पन्न करण्यात आले असुन सदर आरोपीतांना पो.स्टे.ला आणुन त्यांचे विरूध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. व सदर गुन्हयातील ईतर अनोळखी आरोपी यांचा शोध घेणे सुरू आहे.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. चंद्रकांत रेडड़ी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अकोला श्री. सुदर्शन पाटील साहेब यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अकोला येथील पोलीस निरीक्षक संजय गवई व पो.स्टे.डि. बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बहादुरकर, पोहवा. अश्वीन सिरसाट, पोहवा. अजय भटकर पोहवा. ख्वाजा शेख व पोकॉ. शैलेश घुगे यांनी केली आहे. तसेच सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोले हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here