
कळंब तालुका प्रतिनिधी :-पवन जाधव
कळंब :-शेतकरी खरीप पिकाकडे आस लावून बसला असताना आठवडा भरापासून सतत पाऊस पडत असल्याने शेतात साचलेले पाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तालुक्यातील शेतशिवारात सततच्या पावासाने सोयाबीन, तूर व कपाशीचे नुकसान झाले आहे. सोयाबीन व कपाशीला सर्वाधिक फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे.*शासन पुसणार काय*सततच्या पावसाने कपाशीची निम्म्याहून अधिक बोंडे झाडावरच काळी पडून सडत आहेत. पावसाने हजारो हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. कळंब तालुक्यातील मेटीखेडा संपूर्ण मंडळातील मेटीखेडा, पहूर (ईजारा), मार्कंडा, कोळेझरी, किन्हाळा, पालोती, अंतरगाव, डोंगरखर्डा, तिधरी, पिंपळशेडा, पार्डी,गांधीनगर, देवनाळा, पिढा, कुसळ, मुसळ, झाडकिन्ही, किनवट, परिसरात आठवडा भरापासून सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसानसध्या ही खुनी नदी दुथडी भरून वाहत आहे. मेटीखेडा-डोंगरखर्डा परिसरात शनिवारी दुपारी ३.०० वाजता पावसाला सुरुवात झाली. जवळपास दोन ते अडीच तास जोरदार पाऊस झाल्याने शेतातील सोयाबीन, कपाशी, तूर पाण्याखाली गेले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.सततच्या पावसाने कळंब तालुक्यातील मेटीखेडा-डोंगरखर्डा परिसरात सोयाबीनवर ‘यलो मोझेंक’चा प्रभाव दिसत आहे.कपाशी ची बुरशी मुळे पाती गळ दिसून येत आहे परिणामी शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. मुसळधार पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामेकरून शेतकऱ्यांना सरसकट त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.