श्री जागेश्वर विद्यालय, वाडेगाव येथे सायबर सुरक्षा कार्यशाळा यशस्वी

0
44

वाडेगाव: मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी श्री जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाडेगाव येथे ३ ऑगस्ट रोजी सायबर सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या ‘सायबर वॉरियर्स’ साक्षी फाटकर आणि हर्षा बिहाडे यांनी या कार्यशाळेचे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल आणि इंटरनेटच्या चुकीच्या वापरामुळे वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांविषयी सविस्तर माहिती दिली. मोबाईलवरील WhatsApp, Instagram, Facebook सारख्या ॲप्सचा तसेच ऑनलाइन गेमिंगचा गैरवापर कसा टाळावा आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम कसे टाळावे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.सायबर वॉरियर्सनी विद्यार्थ्यांना फसव्या वेबसाइट्स कशा ओळखायच्या आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबद्दलही महत्त्वाच्या टिप्स दिल्या. त्यांनी ‘टू-स्टेप व्हेरिफिकेशन’ (Two-Step Verification) आणि ‘टू-फॅक्टर ऑथेंटिफिकेशन’ (Two-Factor Authentication) सारख्या सुरक्षा सेटिंग्जचा वापर करण्यास सांगितले. तसेच, केवळ ‘सर्टिफाइड’ (Certified) वेबसाइट्सलाच भेट देण्याचा सल्ला दिला. सुरक्षित आणि असुरक्षित लिंक्स कशा ओळखायच्या, तसेच मोबाईल आणि सोशल मीडिया अकाउंट्स सुरक्षित ठेवण्यासाठी ‘स्ट्रॉंग पासवर्ड’ (Strong Password) कसा तयार करावा, याबाबतही त्यांनी प्रात्यक्षिकासह माहिती दिली. या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसनही करण्यात आले.या कार्यशाळेचे आयोजन श्री जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री गोपाल मानकर यांच्या परवानगीने करण्यात आले होते. याप्रसंगी शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोला येथील प्राचार्य डॉ. जे. एम. साबू आणि समन्वयक डॉ. दीप्ती पेठकर यांचे मार्गदर्शन लाभले. क्विक हील फाऊंडेशन, पुणे आणि महाराष्ट्र सायबर सेल यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा पार पडली.या कार्यशाळेला शाळेचे प्राचार्य श्री गोपाल मानकर, शिक्षक श्री शिंदे, श्री यवले, श्री मुरुमकार, श्री चांडे, श्री जडाळ, तसेच श्रीमती मार्के आणि श्रीमती धकाते यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने ही कार्यशाळा अत्यंत यशस्वी ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here