
कळंब तालुका प्रतिनिधी :- पवन जाधव मोहदा* ग्रामपंचायत कार्यालयात आजनाभिक संघटनेला ( नाव्ही) समाजासाठी एक ऐतिहासिक क्षण साकार झाला. समाजमंदिरासाठी दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या नाव्ही समाज बांधवांना अखेर हक्काची जागा मिळाली आहे.सरपंच अक्षय मेश्राम यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि नाव्ही संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाला. या प्रसंगी सरपंच अक्षय मेश्राम यांनी समाजबांधवांना जागेचा नमुना सुपूर्द केला.नाभिक समाजाच्या वतीने सरपंचांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला व समाजबांधव उत्साहाने उपस्थित होते.नाभिक संघटनेचे पांढरंकवडा तालुका अध्यक्ष कैलास फुलभोगे यांनी समाजाच्या वतीने आभार मानले व या पुढे संपूर्ण नाभिक समाज सरपंच च्या पाठीशी आहे अशी ग्वाही दिली.सरपंच बाईट==*इतक्या वर्षांनंतर मिळालेल्या या हक्काच्या जागेमुळे समाजामध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण असून, लवकरच या ठिकाणी भव्य समाजमंदिर उभारले जाणार आहे.अशी ग्वाही सरपंच अक्षय मेश्राम यांनी नाभिक संघटनेला दिली*






