
केळापूर तालुका प्रतिनिधी विशाल येलोरे
मोहदा – सतत च्या पावसामुळे मोहदा परिसरात ढगफूटी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच सतत येणाऱ्या पावसामुळे शेतकरी हा आधीच हवालदिल झाला आहे. सतत च्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन तूर कपाशी या पिकाला सर्वाधीक फटका बसला आहे.सततच्या पावसामुळे कपाशीची निम्याहून अधिक बोडे झाडावरच काळी पडून सडत आहे, या पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.केळापूर तालुक्यातील मोहदा रुंझा,संपूर्ण मंडळ तसेच परिसरातील सर्वच गावाला या पावसाचा फटका बसला आहे. या परिसरातील सर्वच नदी नाले हे दुथडी भरून वाहत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे.*शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा*शेतकरी वर्गाची मागणीसततच्या पावसाने केळापूर तालुक्यातील मोहदा रुंझा परिसरात सोयाबीनवर ‘यलो मोझेंक’चा प्रभाव दिसत आहे.कपाशी ची बुरशी मुळे पाती गळ दिसून येत आहे परिणामी शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. मुसळधार पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामेकरून शेतकऱ्यांना सरसकट त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्ग करीत आहेत.