पेट्रोलींग दरम्यान अवैधरित्या देशी दारुच्या पेट्या घेऊन जाणारी कार जप्त*

0
37

९,९१,२२० रू.मुद्देमाल जप्त**यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :- नरेश राऊत* राळेगाव:-दि.१६/०९/२०२५ रोजी पोलीस स्टेशन राळेगाव येथील पोलीस कर्मचारी रात्री त्या वेळी रोडवर पेट्रोलींग करत असतांना रात्री १:३० च्या दरम्यान गोपनिय माहीती मिळाली की,एक ह्युंदाई कंपनी च्या पांढऱ्या रंगाची क्रेटा चारचाकी वाहन क्र. एम.एच. ३६ एच ७२८८ मध्ये अवैद्यरित्या देशीदारूच्या पेट्या घेवुन वर्धा जिल्ह्यातुन चिखली मार्गे राळेगावकडे येत आहे,अशी माहीती मिळाली तरी पोस्टे कर्मचारी यासह सावंगी (पेरका) रोडचे वळन रस्त्यावर सापळा रचून पोलीस वाहनासह थांबले असता माहीती प्रमाणे एक पांढ-या रंगाची क्रेटा चारचाकी वाहन क्र.एम.एच.३६ एच ७२८८ ही येतांना दिसले.वरून सदर वाहन रोडवर नाकाबंदी करून थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने त्यांचे वाहन न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे वाहन रोडचे बाजुला असलेल्या नाल्यामध्ये अडकली तेव्हा सदर वाहनातील वाहन चालक हा अंधाराचा फायदा घेवुन शेतशिवारामध्ये पळुन गेला,त्याचा पाठलाग केला असता मिळुन आला नाही.सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये देशीदारूच्या ११ पेट्या एकुण किंम्मत ४१.२२०/- रूपये व क्रेटा चारचाकी वाहन क्र.एम.एच.३६ एच ७२८८ ची किंमत ९,५०,००/- रूपये असा एकुण ९,९१,२२०/- रूपये चा मुद्देमाल जप्त करण्याच आला असुन वाहन चालकावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक कुमार चिंता,उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा श्री. रॉबिन बन्सल यांचे मार्गदर्शाखाली पोलीस निरीक्षक शितल मालटे,सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गोपाल वास्टर, पोलीस अंमलदार सुरज चिव्हाणे, सुरज गावंडे, विशाल कोवे, अविनाश चव्हान, संजय शेंद्रे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here