
प्रतिनिधी अमोल चव्हाण दर्यापूरः महिला मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष, श्री. आदेश ठाकरे, यांच्या वाढदिवसानिमित्त आज दर्यापूर येथील संत गाडगेबाबा अनाथ आश्रमातील मुलांना फळे, केळी आणि बिस्किटे वाटून आनंद साजरा करण्यात आला.यावेळी महिला मुक्ती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा, सौ. संगीता इंगळे, तालुकाध्यक्ष विजय भुयार, कार्याध्यक्षा सोनू विल्हेकर, सचिव लता ढोके, तालुका निरीक्षक अमोल चव्हाण आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण समोर आले.









