
केळापूर तालुका प्रतिनिधी विशाल येलोरे मोहदा :-आज सरपंच बाबाराव धुर्वे ग्रामपंचायतव ग्रामसेविका कीर्तीताई खोपे मोहदरी यांना 15 व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोहदरी शाळेत वस्तू देण्याबाबत निवेदन देण्यात आले त्यामध्ये सोलर पॅनल,ब्लूटूथ स्पीकर, माईक सोबत आणि नवीन शौचालयाला लोखंडी गेट बसून देणे या संदर्भाने निवेदन देऊन शाळेला या वस्तू तात्काळ उपलब्ध करून देण्यासंदर्भात विनंती करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच बाबाराव धुर्वे ग्रामपंचायत अधिकारी कीर्तीताई खोपे रोहणे मॅडम प्रभारी मुख्याध्यापक कैलास मडावी, सचिन गायकवाड, धुमाळे सर, वागदरे सर,सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ येलोरे, मडावी साहेब तथा ग्रामस्थ उपस्थित होते सदर शाळेला देण्यात आलेल्या मागणी करिताअध्यक्ष निलेश चव्हाण तथा सचिव शाळा व्यवस्थापन समिती मोहदरी यांनी निवेदन दिले होते यांची दखल घेऊन ग्रामपंचायत देण्यासाठी समोर येऊन होईल तेव्हढया लवकर शाळा व्यवस्थापन समिती कडे वर्ग करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे