
तालुका प्रतिनिधी विशाल येलोरेपांढरकवडा:- दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी रात्री पाटणबोरी येथे पोलिसांनी घेतलेल्या नाकाबंदी दरम्यान देशी दारू वाहतूक करणारी एक विनानंबर काळी स्कॉर्पिओ वाहन पकडण्यात आली. या कारवाईत तब्बल ₹21 लाख 38 हजार 720 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.नाकाबंदी दरम्यान पोहेकॉं. राम राजुसिंग राठोड व पो.कॉं. सुर्यकांत गिते यांना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, एक विनानंबर स्कॉर्पिओ वाहनातून अवैध दारू वाहतूक होत आहे. त्यानंतर कोपा मांडवी फाट्यावर सापळा रचून संशयित वाहन थांबवण्यात आले. वाहनात दोन इसम आढळून आले. तपासणीअंती गाडीतून देशी दारूच्या 10 पेट्या सापडल्या.तपासात वाहनचालकाचे नाव अमित मोहन जाधव (रा. उमरी, ता. केळापूर, जि. यवतमाळ) तर वाहन मालकाचे नाव संस्कृत दत्ताजय गटलेवार (रा. नेहरू नगर, घाटंजी, जि. यवतमाळ) असे समोर आले. दोघांकडे दारू विक्री व वाहतुकीचा परवाना तसेच वाहनाचे कागदपत्र नसल्याचे स्पष्ट झाले.जप्त केलेल्या दारूमध्ये :180 मिली क्षमतेच्या 384 काचेच्या शिश्या (एकूण किंमत ₹30,720/-)90 मिली क्षमतेच्या 200 प्लास्टिक शिश्या (किंमत ₹8,000/-)विनानंबर स्कॉर्पिओ वाहन (किंमत अंदाजे ₹21 लाख)अशी एकूण ₹21,38,720/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सदर कारवाई पंचासमक्ष करून नमुने स्वतंत्रपणे घेत सिलबंद करण्यात आले असून उर्वरित मुद्देमाल व वाहन पोलिस ताब्यात आहे. आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.👉 पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अवैध दारू तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावला गेला आहे.