दर्यापूर येथे क्रीडा मंत्र्यांचे भव्य स्वागत : स्विमिंग पूल उभारणी व क्रीडा संकुल कामांना गती देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी

0
16

दर्यापूर : प्रतिनिधी अमोल चव्हाण महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा. नामदार माणिकराव कोकटे साहेब यांचा नियोजित दौऱ्यानिमित्त दर्यापूर येथील ऍग्री कोअर उत्पादक कंपनी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.या स्वागत प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष निलेश पाटील मोपारी, शहराध्यक्ष अमोल अशोकसिंह गहरवार, ऍग्री कोअर चे किरण पाटील अरबट तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मंत्र्यांना निवेदन देऊन दर्यापूर शहरात युवक-युवती व विद्यार्थ्यांसाठी आधुनिक स्विमिंग पूल उभारणी करावी अशी मागणी करण्यात आली. स्विमिंग पूल उभारणीमुळे शहरातील क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल आणि अनेक खेळाडू घडतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.सोबतच काही महिन्यांपूर्वी तालुका क्रीडा संकुलासाठी मंजूर झालेला निधी अजूनही खर्च झालेला नाही. त्यामुळे तात्काळ तो निधी खर्च करून संकुलातील कामांना गती द्यावी, अशी ठाम मागणी देखील करण्यात आली.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष निलेश भाऊ मोपारी, शहराध्यक्ष अमोल दादा गहरवार, जिल्हा सहसचिव निलेश भाऊ जुनघरे, जिल्हा सरचिटणीस कुलदीप पाटील काळे, किरण पाटील अरबट, शुभम पाटील होले, शहर उपाध्यक्ष कपिल पाटील पोटे, युवक अध्यक्ष नितिन गावंडे, युवक शहराध्यक्ष प्रतिक पाटील नाकट, घडेकर सर, सुनिल भाऊ सोळंके , डिगांबर पाटील गावंडे , शेखर भाऊ मेश्राम , सचिन भाऊ गोंडचर , अमोल भाऊ चव्हाण , गजानन भाऊ सोळंके , गजानन भाऊ मानकर , हर्षल भाऊ खाडे , अनिकेतराव देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here