
दर्यापूर, (प्रतिनिधी अमोल चव्हाण): चालू वर्षातील सततच्या अतिवृष्टीमुळे दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, दोन्ही तालुक्यात तातडीने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. श्री. गजाननभाऊ लवटे यांच्या नेतृत्वाखाली आज दर्यापूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराशेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले. आमदार लवटे यांनी अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, “जर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा झाले नाहीत, तर आम्ही अधिक आक्रमक पवित्रा घेऊ.” त्यांच्या या इशाऱ्यामुळे प्रशासनावर तातडीने कार्यवाही करण्याचा दबाव वाढला आहे.या मोर्चामध्ये शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीचे पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मोर्चात उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावेशिवसेना पदाधिकारी * उपजिल्हाप्रमुख, अमरावती: मा. महेंद्रभाऊ दीपटे * जिल्हा समन्वयक: मा. प्रदीपभाऊ वडतकर * सहकार सेना जिल्हाप्रमुख: मा. अरुणभाऊ खारोडे * विधानसभा संघटक: मा. बबनराव विल्हेकर * विधानसभा समन्वयक: मा. प्रमोदभाऊ गिरनाळे * तालुकाप्रमुख, दर्यापूर: मा. प्रमोदभाऊ धानोरकर * तालुका संघटक: मा. गुणवंतभाऊ गावंडे * उपशहरप्रमुख, दर्यापूर: मा. दीपकभाऊ बगाडे * तालुकाप्रमुख, अंजनगाव सुर्जी: मा. कपिलभाऊ देशमुख * शहरप्रमुख, अंजनगाव सुर्जी: मा. राजूभाऊ अकोटकरयुवासेना पदाधिकारी * जिल्हाप्रमुख, अमरावती: मा. अंकुश पाटील कावडकर * जिल्हा चिटणीस: मा. प्रतीकभाऊ राऊत * तालुकाप्रमुख, दर्यापूर: मा. सागरभाऊ गिरे * तालुकाप्रमुख, अंजनगाव सुर्जी: मा. विशुभाऊ सावरकर * शहरप्रमुख, दर्यापूर: मा. रुपेशभाऊ मोरे * समन्वयक: पंकजभाऊ राणेमहिला आघाडी पदाधिकारी * जिल्हाप्रमुख: सौ. अलकाताई पारडे * महिला जिल्हाप्रमुख: सौ. ज्योतीताई अवघड * उपजिल्हाप्रमुख: सौ. वर्षाताई भोंडे * तालुकाप्रमुख, अंजनगाव सुर्जी: सौ. संगीताताई तुरखेडे * उपशहर प्रमुख: सौ. सुनिताताई मांडवे * शहरकोषाध्यक्ष, दर्यापूर: सौ. पूजाताई रामावंत * उपशाखाप्रमुख: सौ. मनीषाताई कडूयाव्यतिरिक्त, मा. राजूभाऊ मानकर (उपतालूकाप्रमुख), सरपंच मा. किशोरभाऊ टाले (टाकळी), मा. मोहनभाऊ बायसकर (नरसिंगपूर), मा. विजयभाऊ अढाऊ, तसेच सौ. विद्याताई बयास, सौ. संजीवनीताई नेमावत, आशिषभाऊ लायले, अमोलभाऊ गावंडे, सतीशभाऊ साखरे, अभिजीतभाऊ मावळे, अभिजितभाऊ भावे, निलेश पारडे आणि इतर असंख्य शिवसैनिक या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.