
दर्यापूर प्रतिनिधी अमोल चव्हाण : दर्यापूर तालुका आणि अमरावती जिल्ह्यातील तायक्वांदो व कराटे खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अमोल अशोकसिंह गहरवार यांनी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यात शहरी व ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध मागण्या करण्यात आल्या.निवेदनातील प्रमुख मागण्या: * प्रशिक्षण आणि साहित्य: तायक्वांदो आणि कराटेसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू करणे. स्थानिक प्रशिक्षकांना शासनमान्यता देऊन त्यांना योग्य मानधन देणे. तसेच, खेळाडूंना आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे. * आर्थिक मदत: पात्र खेळाडूंना शिष्यवृत्ती आणि स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवास खर्च शासनाकडून देण्यात यावा. * स्पर्धा आणि प्रोत्साहन: विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांचे नियमित आयोजन करणे आणि शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये तायक्वांदो व कराटेचा समावेश करणे. * वैद्यकीय सुविधा: खेळाडूंना दुखापत झाल्यास वैद्यकीय मदत आणि विमा सुविधा उपलब्ध करून देणे.या वेळी गहरवार यांनी सांगितले की, दर्यापूरमधील शिव वॉरीयर्स कला, क्रीडा बहुउद्देशिय संस्थेच्या माध्यमातून अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व राज्य स्तरावर यश मिळवले आहे. त्यांना योग्य संधी व सुविधा मिळाल्यास ते नक्कीच महाराष्ट्राचा गौरव वाढवतील.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निलेश मोपारी, शहराध्यक्ष अमोल गहरवार, जिल्हा सहसचिव निलेश जुनघरे, जिल्हा सरचिटणीस कुलदीप पाटील काळे, किरण पाटील अरबट, शुभम पाटील होले, शहर उपाध्यक्ष कपिल पाटील पोटे, युवक अध्यक्ष नितिन गावंडे, युवक शहराध्यक्ष प्रतिक पाटील नाकट, घडेकर सर, सुनिल सोळंकी, शहर सरचिटणीस योगेश पाटील हिंगणकर, डिगांबर पाटील गावंडे, शेखर मेश्राम, सचिन गोंडचर, अमोल चव्हाण, गजानन सोळंके, गजानन मानकर, हर्षल खाडे, अनिकेतराव देशमुख, उमेश कोकाटे, गणेश माहुरे, निखिल कोरडे, शेख रफिक, निखिल बिजवे, श्याम केने, आदित्य देशमुख, शुभम मते, अमोल घुरडे, लखन म्हैसने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.