मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात ‘महसूल लोकअदालत’ यशस्वी

0
11

मूर्तीजापूर: छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत ‘सेवा पंधरवाडा’ अभियानाचा भाग म्हणून, उपविभागीय अधिकारी कार्यालय, मूर्तीजापूर येथे दिनांक २३ सप्टेंबर रोजी महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये प्रलंबित महसुली, अर्ध-न्यायिक आणि अपील प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली, ज्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचण्यास मदत झाली.उपविभागीय अधिकारी श्री. संदीपकुमार अपार यांच्या अध्यक्षतेखाली ही लोकअदालत पार पडली. या कार्यक्रमात एकूण ४० प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. काही प्रकरणांमध्ये पक्षकारांनी सामंजस्याने आपसी समझोता करून प्रकरणे निकाली काढली.यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. डी. एल. देशमुख, वकील बांधव आणि संबंधित पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलदगतीने होण्यास मदत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here