
मोहदा:-आज दिनांक 26सप्टेंबर रोजी गट ग्रामपंचायत कोळेझरी तालुका कळंबअंतर्गत येत असलेल्या मार्कडा येथील महिला व ग्रामपंचायत उपसरपंच गौतम महादेव थुल व ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी वैशाली थुल सहित अन्य महिला मौजे मार्कडा येथील जलस्वराज पाणीपुरवठा विहीरी वरती कनेक्शन गावफिडर वरून विद्युत कनेक्शन करून देण्यासाठी मोहदा विद्युत वितरण कंपनी चे अभियंता पोतदार साहेब यांना विद्युतपुरवठा मिळणे बाबत गट ग्रामपंचायत कोळेझरी कडून ठराव व निवेदन देण्यात आलेआजपर्यंत पाणीपुरवठा कनेक्शन है AG फिडर वरुन असल्यामुळे तेथील विद्युतपुरवठा सारखा बंद राहते त्यामुळे गावकन्यांना पाणी मिळत नाही तरी जलस्वराज पाणीपुरवठा विहिरी कारिता नवीन कनेक्शन गाव फिडर वरून विद्युत मिळणेबाबत 26 सप्टेंबर 25रोजीग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकारी सोबत महिला भगिनी धडकल्या यावेळी अर्चना मेश्राम, लक्ष्मी चिंचाळकर, वैशाली चव्हाण, गीता आत्राम, अंजना हूड, सोनू चिंचाळकर, अनिता पेंदोर, वैशाली पेंदोर, बाली कडू, वनिता कुंभेकर, चंदा पेंदोर, पपीता चव्हाण शालूबाई चिंचाळकर सहित अन्य महिला हजर होत्या.विद्युत वितरण कंपनी यांनी समाधान कारक उत्तर देत लवकरच गावफिटर कनेक्शन जोडणी करणार असल्याचे सांगितले