
दर्यापूर (प्रतिनिधी) अमोल चव्हाणदर्यापूर-अमरावती मार्गावरील धनंजय लाजजवळ राजेश इंगळे यांचा दोन दिवस अगोदर मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती आणि तत्परतेने कारवाईला सुरुवात केली होती या कारवाईत दर्यापूर पोलिसांना मोठा यश मिळाला आहे दर्यापूर पोलिसांची युद्धपातळीवरील चौकशीचा वेग वाढवला होता पोलिसांनी सर्व शक्यता तपासून आरोपीचा शोध सुरू केला. अवघ्या दोन दिवसांत तपासाला गती देत पोलिसांनी प्रकरणातील संशयिताला गाठले.आरोपीकडून कबुलीचौकशीतून उघड झाले की, ओम देशमुख (वय 19 वर्षे, रा. तहसील कार्यालयपरिसर, दर्यापूर) याने राजेश इंगळे यांचा खून केला असून, त्याने पोलिसांसमोर ही कबुली दिली. आरोपीला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहेकौतुकहीपोलिसांच्या कारवाईचेघटना उघड होताच दर्यापूर शहरात भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईमुळे शहरातील नागरिकांत काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला असून, पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणातील समोरील तपास दर्यापूर पोलीस करीत आहे.