
अमरावती, दि. 25 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी अधीक्षक निलेश खटके यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यांनीही दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.