
प्रतिनिधी अमोल चव्हाण दर्यापूर: शांती नगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक दिनाचे महत्त्व जपण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.यावेळी माजी नगरसेवक अनिल भाऊ बागडे, माजी नगरसेवक वैभव भाऊ बागडे, तसेच श्रीकृष्ण मेश्राम आणि सिद्धार्थ च. सावळे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि नगर परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि रॅलीमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.या रॅलीमुळे शांती नगरमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आणि धम्मचक्राच्या महत्त्वाच्या संदेशाची आठवण यानिमित्ताने ताजी झाली.