*अनुसूचित जाती मधील उपेक्षित, वंचित असलेल्या मातंग समाजाला कौशल्य विकास, स्वयंरोजगार, ग्राम व लघु उद्योजकता च्या माध्यमातून आर्थिक क्षेत्रात आत्मनिर्भर व स्वावलंबी करणार.. परिमल कांबळे

0
14

अकोला, ०५ ऑक्टोबर २०२५: अनुसूचित जातीमधील उपेक्षित व वंचित मातंग व तत्सम समाजाला आर्थिक क्षेत्रात आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या ध्येयाने कौशल्य विकास, स्वयंरोजगार, ग्राम व लघु उद्योजकता या माध्यमांतून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अकोला येथे जिल्ह्यातील प्रमुख सामाजिक नेते, व्यवसायिक, सुशिक्षित युवक आणि महिला यांच्या समवेत एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले.या बैठकीत आधुनिक काळातील प्रचलित व्यवसाय आणि माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून मातंग समाजासाठी कौशल्य विकास, स्वयंरोजगार, कुटीर उद्योजकता व लघुउद्योजकता या क्षेत्रांत कृतिशील आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजाला देशाच्या प्रगतीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी लवकरच एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्पही या बैठकीत निश्चित करण्यात आला.विदर्भातील मातंग समाजाकरिता महत्त्वपूर्ण सुरुवातया नियोजित कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील यशस्वी मार्गदर्शक, केंद्र व राज्य उद्योग मंत्रालयातील उच्च पदस्थ शासकीय अधिकारी तसेच व्यवसायिक यांचे कौशल्य विकास व उद्योजकतेशी निगडित मौलिक मार्गदर्शन लाभणार आहे. स्वयंरोजगार आणि लघुउद्योजकता या क्षेत्रात विदर्भातील मातंग समाजाकरिता ही एक महत्त्वपूर्ण आणि निर्णायक सुरुवात ठरणार आहे.राष्ट्रीय लहुशक्तीचे अध्यक्ष परिमलदादा कांबळे यांची संकल्पनाया महत्त्वाकांक्षी बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक आणि ही संकल्पना मांडणारे राष्ट्रीय लहुशक्तीचे अध्यक्ष श्री. परिमलदादा कांबळे होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते श्री. रामदासजी तायडे साहेब होते.यावेळी मा. जिल्हा परिषद सदस्य जयदेवजी इंगळे, सुभेदार रमेश खंदारे, बाळासाहेब तायडे, नानासाहेब सदनशिव, मधुकरराव वानखडे, महादेवजी क्षीरसागर, सुनील खंदारे, गजाननदादा साठे, ऍड. आनंद तायडे, राहुल खंडारे, आणि अमरावती इंगळे यांनी आपले अनुभव आणि सकारात्मक विचार व्यक्त केले. समाजाला अशा प्रकारच्या व्यवसायिक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.बैठकीत मान्यवरांची उपस्थितीया बैठकीला श्रीमती यशोदाबाई गायकवाड, राजेश अवचार, नागेश वैराळे, आकाश धुरदेव, भूपेंद्र अंभोरे, किशोर वाघमारे, साहेबराव दिआले, किशोर खंडारे, अनिता वानखडे, आशिष कांबळे, रोशन स्वर्गीय, निलेश स्वर्गीय, अजय सरकटे, राजू पांढरे, राजीव तायडे, अनिल तायडे, विनोद दामोदर, बंडू गायकवाड, गजानन धुळदेव, संतोष चव्हाण, रामचंद्र नवकर, मनोहर तायडे इत्यादी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन श्री. बालकृष्ण गायकवाड यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here