
मूर्तिजापूर -दि. १०, १०, २०२५ ला समाज क्रांती आघाडीच्या वतीने मूर्तिजापूर तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला त्या मोर्चाचे नेतृत्व समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.हंसराजजी शेंडे सर यांच्या नेतृत्वात होता या मोर्चाच्या माध्यमातून विद्यमान राष्ट्रपती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व तहसीलदार मुर्तीजापुर यांना निवेदन देण्यात आली त्यामध्ये देशाचे सर्वोच्च न्यायालय या न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचा ज्या पद्धतीने अवमान करण्यात आला त्याचा तीव्र निषेध करण्यात येऊन हा न्यायाधीशाचा अपमान नसून हा देशातील न्यायप्रणालीचा अपमान आहे.या देशातील न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणारा जनतेचा अपमान आहे. असे ते बोलत होते महाराष्ट्रामध्ये जन सुरक्षा कायदा हा जन सुरक्षा कायदा नसून धन सुरक्षा कायदा आहे. अर्थात धनाड्य लोकांना कसं संरक्षण देण्यात येईल इथल्या राजकर्त्या राजकारण्यांना कसे संरक्षण देता येईल आणि जनसामान्यांच्या हक्कासाठी न्याईक मार्गाने निवेदने मोर्चे उपोषणे वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करता येणार नाही. अर्थात भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19 चे उल्लंघन असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा घाला आहे हे बिल असंविधानिक असून ते रद्द व्हायला पाहिजे असेही ते म्हणाले पुढे असे म्हणाले की प्रशासन एवढं सुस्तावलेल आहे की जनसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी त्यांना वारंवार घीरट्या घालाव्या लागतात तरी त्यांना न्याय मिळत नाही प्रशासनावर शासनाचा अंकुश राहिलेला नाही प्रशासन हे मनमानी काम करत असून नियम आणि कायदे त्यांनी धाब्यावर बसवले आहेत त्याचंच उदाहरण म्हणजे मूर्तिजापूर येथील भीम नगर आणि गौतम नगर याची शासकीय मान्यता असून 16 फेब्रुवारी 2018 सर्वांसाठी घरे हे शासकीय परिपत्रक असून विद्यमान जिल्हाधिकारी अकोला यांचे तशा सूचना असूनही मूर्तिजापूरचे उप विभागीय अधिकारी त्या सूचनाचे आदेशाचे पायमल्ली करतात जनतेला त्यांच्या हक्कापासून दूर ठेवतात अर्थात राज्यघटनेच्या अनुच्छेद 14 आणि 21 चे उल्लंघन करतात अशा निर्ढावलेल्या अधिकाऱ्याला कायद्याचा धाक राहिलेला नाही त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण राहिलेले नाही अशा अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणे हे अगत्याचे असल्याने हा इशारा मोर्चा आज काढण्यात आला असून या मोर्चामध्ये मार्गदर्शक म्हणून समाज क्रांती आघाडीचे केंद्रीय कार्यकर्ते डॉ. प्रा. गोपाल उपाध्य सर यांनीही आपले मार्गदर्शन केले या मोर्चामध्ये असंख्य लोकांचा सहभाग होता त्यामध्ये मुख्य आयोजक सुदामभाऊ शेंडे, अशोकभाऊ वरघट संजय इंगळे शिलवंत भाऊ वानखडे भीमराव खंडारे नाजूकराव खंडारे निरंजन गवई प्रकाश जामनिक सरपंच, उपसरपंच व संपूर्ण सदस्य गण विनोद चाहकर विजय अंभोरे विनायक इंगळे सत्यभामा इंगळे शालुबाई खंडारे बाळू डोंगरे नंदकिशोर ननिर धम्मानंद तायडे राजु अंभोरे जानराव खंडारे निलेश वानखेडे अक्षय गवई विनोद इंगळे प्रवित्रा खंडारे अंबाबाई इंगळे ज्योती इंगळे महेंद्र खंडारे मंगेश इंगळे गौतम आटोटे नाजुक इंगळे पुरुषोत्तम इंगळे.भिम नगर व गौतम नगर येथील गावकरी असंख्येने आवर्जून उपस्थित होते. असे बंडुदादा वानखडे समाज क्रांती आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष