अकोला पोलीस दलाच्या वतीने दिवाळीपूर्वी एकूण ₹1 कोटी 30 लाखांपेक्षा अधिक किंमतीचा मौल्यवान मुद्देमाल व मोबाईल फिर्यादी यांना परत… एक अनोखी दिवाळी भेट.. उत्कृष्ट गणेश उत्सव मंडळ स्पर्धेतील विभागानुसार निवड झालेल्या गणेश मंडळांना रोख रक्कम 05 हजार व पारितोषिक देऊन सन्मानित..

0
5

अकोला, दि. 16 ऑक्टोबर 2025 मा. श्री. अर्चित चांडक (भा.पी.से.) पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला पोलीस दलाच्यावतीने दिवाळीच्या शुभ पर्वांवर राणी महल, पोलीस लॉन, अकोला वेळ दुपारी 4.00 वा. आयोजित विशेष कार्यक्रमात नागरिकांना एकूण ₹1 कोटी 30 लाखांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल व मोबाईल परत देण्यात आला. या कार्यक्रमाचा शुभारंभविशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती मा. श्री. रामनाथ पोकळे (भा.पो.से.) मा. श्री. अर्चित चांडक (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक अकोला, अपर पोलीस अधीक्षक, मा. श्री. वी. चंद्रकांत रेड्डी (भा.पो.से.) यांच्या शुभहस्ते झाला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक अपर पोलीस अधीक्षक मा. रेड्डी यांनी केले. त्यांनी या उपक्रमाचा उद्देश समजावून सांगताना सांगितले की, नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ ठेवणे आणि गुन्ह्यातील मुद्देमाल त्वरित व कायदेशीर प्रक्रियेने परत देणे हे पोलीस दलाचे कर्तव्य आहे. असे मत मांडले.यानंतर 1) अकोला शहर विभाग-105 मोबाईल 1,79,5000 रु, सौते 264 ग्रॅम किंमत 17,96,258, वाहन-40 असा-11,13,000 रु चा मुद्देमाल 2) अकोट विभाग-47 मोचाईल किंमत 8,29,998, 1 ग्रॅम सोने 1,045 रु 3) मूर्तीजापूर विभाग-17 मोबाईल किंमत 1,95,400 वाहन 01 किंमत 23,000 रु चा मुद्देमाल 4) बालापूर विभाग 27 मोचाईल किंमत 3,71,900 रु 01 वाहन किंमत 25,000 रु एकूण संपूर्ण जिल्हा 196 मोबाईल किंमत 31,92,298/-265 ग्रॅम सोने 86,61,892/-रु,42 वाहने किंमत 11,80,000/-रु असा एकूण र 01 कोटी 30 लाख 34 हजार 190 रु/-किंमतीचा मुदेमाल तसेच रोख रकम परत करण्यात आला मोबाईल फोन, सोन्याचे दागिने, मोटारसायकली तसेच इतर मौल्यवान वस्तू संबंधित फिर्यादींना मान्यवरांच्या हस्ते परत करण्यात आल्या. या सर्व वस्तू कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता करून संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्यात आल्या. या उपक्रमामुळे अनेकांच्या चेहन्यावर आनंद आणि समाधान झळकले.यानंतर पोलीस अधीक्षक मा. श्री. अर्चित चांडक यांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पोलीस प्रशासन गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत आहे. त्यांनी नागरिकांना गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी भीती न बाळगता पुढे येण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र, अमरावती मा. श्री. रामनाथ पौकले यांनी मार्गदर्शन करताना अकोला पोलीस दलाच्या कार्याचे कौतुक केले, त्यांनी म्हटले की, हा उपक्रम जनतेचा विश्वास दृढ करणारा आणि पारदर्शक प्रशासनाचे उत्तम उदाहरण आहे.तसेच मा. पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे संपूर्ण जिल्हा स्तराबर “उत्कृष्ट गणेश उत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामचे विभागीय स्तरावर उत्कृष्ट गणेश मंडळांची निवड करण्यात आली. यामधे शहर विभागातून मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळ अकोला, बाळापूर विभागातून खडकेश्वर गणेश उत्सव पातुर, अकोट विभागातून नवनिर्मित गणेश उत्सव मंडळ, आडगाव तसेच मूर्तिजापूर विभागातून समता व्यायाम गणेशउत्सव मंडळ भूर्तिजापूर यांची निवड करून मा.श्री. रामनाथ पोकळे, विशेष पौलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती यांच्या शुभहस्ते रोख रक्कम 05 हजार प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.आभार प्रदर्शन श्री. सुदर्शन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर विभाग) यांनी केले. या वेळी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, ठाणेदार, मुद्देमाल अंमलदार तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.या उपक्रमामुळे अकोला पोलीस दलाने नागरिकांशी अधिक दृढ नातं निर्माण केलं असून, “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीदवाक्याला साजेशी सेवा प्रत्यक्ष कृतीत उतरवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here