आदिवासी गोंड गोवारीं चा ढाल उत्सव सर्वत्र साजरा

0
5

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:- नरेश राऊत यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव,झरी व वणी तालुक्यातील शेकडो गावात दिवाळीच्या पाडव्याला आदिवासी गोंड गोवारी जमातीचा ढाल पुजन व गाय गोदन हा पारंपारिक उत्सव धुमधडाक्यात डफडे, सनई व पाऊलच्या गजरात,नाचत,बिरवे म्हणत सर्वञ साजरा करण्यात आला. या ढाल व गाय गोदन उत्सवाची परंपरा शेकडो वर्षापासुन चालत आलेली असुन ही आदिवासी गोंड गोवारींची वैशिष्ट्येपुर्ण संस्कृती आहे.गोंडी धर्माचे आद्य संस्थापक पहांदी पारी कोपाल लिंगो चे प्रतीक दोन तोंडी ढाल व माता जंगो रायताड चे प्रतीक चार तोंडी ढाल दरवर्षी दसरा सणाला बाहेर काढुन विधीवत पुजा करुन बांबुच्या काठीवर उभी केली जाते.दिवाळीच्या पाडव्यापासुन कार्तिक पौर्णिमेपर्यंत गावात मिरवणूक काढुन वाजत गात ही ढाल नाचवली जाते.शेकडो आदिवासी बांधव यात सहभागी होतात.घरोघरी जाऊन धान्य व पैसा गोळा केला जातो.शेवटी कार्तिक नंतर ढालीला बकऱ्याचा भाव देऊन आपले आप्तेष्ट,सोयरे व आदिवासी बांधवांना बकऱ्याचे व कण्या भाकरीचे जेवण दिले जाते. आज दिनांक २२/१०/२०२५ ला आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समितीचे अध्यक्ष माधव कोहळे व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मारेगाव व झरी तालुक्यातील अनेक गावात संपन्न झालेल्या ढाल पुजन उत्सव व गाय गोदन कार्यक्रमात सहभाग घेतला.मारेगाव तालुक्यातील खंडणी गावात श्री.विलास नेहारे यांच्या घरच्या ढालीच्या कार्यक्रमात गोंड गोवारी व कोलाम बांधव सहभागी झाले.त्यानंतर रोहपाट गावात श्री.सुरज नागोसे यांच्या घरच्या ढाल पुजन कार्यक्रमात सहभाग घेतला.सायंकाळी झरी तालुक्यातील सुसरी गावात डफडे,सनई च्या वाद्यात वाजत गाजत शेकडो आदिवासी स्ञी पुरुषांनी नाचत गात गावातुन ढालीची मिरवणूक काढली. यावेळी आदिवासी नेते माधव कोहळे यांचे सोबत तिरु.संजय चचाने,शञुघन ठाकरे,धनराज खंडरे,सुभाष लसंते,अंकुश नेहारे,विलास नेहारे,संतोष ठाकरे,कैलास वाघाडे,सुनिल वाघाडे,उध्दव कोहळे,श्रावण वाघाडे,विठ्ठल गाते,प्रमोद ठाकरे यांचेसह शेकडो समाज बांधवांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here