
मूर्तिजापूर (प्रतिनिधी): देशसेवेची प्रेरणा गावातूनच मिळते हे वाक्य नक्षलवाद आत्मसर्पण. माओवाद्यांना कंठस्नान घालने मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब .पोलीस महासंचालक.यांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र गौरव प्राप्त करून गावातील सुपुत्र वैभव किशोरराव तिडके (C-60 कमांडो उपनिरीक्षक महाराष्ट्र पोलीस दल) यांनीसत्यात उतरविले . त्यांच्या या विलक्षण कार्य गौरवा बद्दल दुर्गवाडा ग्रामपंचायत ग्रामस्थांनी कृतज्ञेने अभिमानाने आणि उत्साहाने त्यांचा सन्मान सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला. ग्रामपंचायत परिसरात पार पडलेल्या कार्यक्रमात सरपंच संतोष गवई (तालुकाध्यक्ष सरपंच संघटना मुर्तीजापुर) उपसरपंच चित्रा सतीश पंडित ग्रा.प. सदस्य शैलेश नवघरे प्रवीण अवघाते .रेखा गवई. यांचे सह सर्व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी सरपंच बापूराव जी पोळकट यांनी भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसरपंच नामदेवराव सुरजुसे माजी सरपंच . रमेशराव अवघाते सुधाकरराव फाटे सौ.रेखा चंदन (पोलीस पाटील) माजी सरपंच गजानन पोळकट(सदस्य शाळा सानियंत्रण समिती मुर्तीजापुर) .गौरव कावरे. रामदासजी पंडित. रामदासजी खंडारे .सुभाष येवले .ज्ञानेश्वर नांदणे .गौतम वानखडे .आदी मान्यवर उपस्थित होते——–सत्कारमूर्ती वैभव तिडके त्यांचे आई रजनी तिडके वडील किशोर तिडके सर्व मान्यवरांचे उन्नती गवई श्रद्धा चंदन ईश्वरी अवघाते सौ शारदा सावळे. वैशाली काळे शितल वाघ श्रेया गंद्रे यांनी औक्षण करून.. ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी संपूर्ण परिसरात जय जवान जय महाराष्ट्र!”चा जयघोष दुमदुमला कार्यक्रमात सरपंच संतोष गवई गजानन पोळकट व संदीप गायगो ले यांनी नक्षलवादाविरुद्ध जनजागृती आत्मसमर्पण समाजभानाचे महत्व त्यांच्या मनोगतातून अधोरेखित केले. वैभव तिडके यांनी आपल्या प्रेरणादायी मनोगतात (C-60 ) कमांडो फोर्स मधील अनुभव जबाबदाऱ्या कार्यातील आव्हाने सांगताना युवक-युवतींना देशसेवा शिक्षण आणि शिस्तीचे धडे दिले त्यांनी सांगितले की आपल्या गावातील प्रत्येक युवकात देश सेवक बनण्याची क्षमता आहे-फक्त ध्येय आणि चिकाटी आवश्यक आहे कार्यक्रमाचे कुशल सूत्रसंचालन दिनेश येवले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अंकुश नवघरे यांनी केले. संपूर्ण ग्रामस्थ विद्यार्थी महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक व युवक -युवती मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा प्रेरणादायी क्षण अविस्मरणीय बनविला दुर्गा वाडा ग्रामस्थांच्या भावनेतून घडलेला हा सन्मान सोहळा केवळ एका जवानाचा गौरव नव्हता तर तो होता भूमिपुत्र –वैभव ला मातृभूमी प्रति असलेल्या निष्ठेचा आणि ग्राम गौरवाचा उत्सव!







