
मूर्तिजापूर : दिवाळी म्हणजे आनंद आणि वाटपाचा सण याच भावनेतून जनसेवक बाबुभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंब प्रतिष्ठान (अंबागेट, बुधवारा, अमरावती) यांच्या वतीने बडनेरा येथील आधार निराधार केंद्रात निराधार महिलांना साडी–चोळी, पुरुषांना ब्लॅंकेट तसेच सर्वांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाला विदर्भ अध्यक्ष व कुस्तीगीर प्रशिक्षक पै. समीर देशमुख, गोविंद प्रभू संस्थानचे पंकजभाऊ, दिनेशभाऊ धस्कट, समाजसेवक सचिनभाऊ वाटकर, तसेच आधार केंद्राच्या संचालिका ज्योतीताई राठोड आणि राजीव सर बसवनाथे प्रमुख उपस्थित होते.या उपक्रमाचे सुयोग्य नियोजन जगदंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गौरव बेलूरकर, उपाध्यक्ष समीर देशमुख, अभिषेक जिरापुरे, निशांत जाचक, प्रसाद कानेलकर, मुकेश बिजवे, ऋषिकेश रिठे, शुभम भाऊ, हर्षल काळे, गोलू गाखरे, पंकज शेळके, भूषण ठाकूर, सुरेशभाऊ ठाकूर, राहुल भुरे, राहुल पंड्या, अखिल ठाकरे, वंश खोपे, तुषार गादे, रणजित सरदार,मयूर वीरूळकर, श्रीकांत गणेशकर, रोहित देऊळकर, प्रियंका ताई चौधरी, शालिनी नेवारे व शीतल सरदार यांनी उत्साहाने केले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांचा सत्कार करून संस्थेच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली. दिवाळीच्या या सामाजिक उपक्रमाने समाजात “खरी दिवाळी म्हणजे आनंदाचे वाटप” हा संदेश दिला.






