
दिनांक २३.१०.२०२५ रोजी पो.स्टे. डाबकी रोड अकोला येथे फिर्यादी नामे सौ. शिला विनायक नागलकर यांनी त्यांचा मुलगा नामे अक्षय विनायक नागलकर वय २६ वर्ष रा. मारोती नगर बाळापुर रोड जुने शहर अकोला हा दिनांक २२. १०.२०२५ चे संध्याकाळी ०५.०० वा. १५ मिनीटात बाहेर जावून येतो असे सांगुन धरून गेला तो अद्यापपावेतो परत आला नाही. अशा फिर्यादवरून पो.स्टे. डाबकी रोड अकोला येथे मिसींग क्रमांक ४४/२०२५ अन्वये मिसींग दाखल करण्यात आली होती.सदर घटनेच्या अनुषंगाने प्रकरणाचे गांभीर्य पाहून मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चित चांडक यांनी सदर गुन्हयाचा तपास हा उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अकोला यांचे कडे सोपविण्यात आला होता. तसेच स्था. गु.शा प्रमुख श्री. शंकर शेळके यांना इतर आरोपी अटके संबधाने आदेशीत केले होते. स्थागुशा चे पथकाने गोपनिय माहीतीच्या आधारे पहील्या दिवशी ०४ आरोपी ताब्यात घेतले होते. (१) चंद्रकांत महादेव बोरकर रा. शिवसेना वसाहात, अकोला (२) आशिष उर्फ आशु शिवकुमार वानखडे रा. जुने शहर, अकोला (३) किष्णा वासुदेव भाकरे रा. मोठी उमरी जि. अकोला (४) अशोक उर्फ ब्रम्हा पांडुरंग भाकरे रा. मोरगाव भाकरे जि. अकोला सदर आरोपी यांना तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांनी वि.न्यायालया समोर हजर केल्यानंतर सर्व आरोपीतांगा ०७ दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. त्याच दरम्यान दिनांक २६.१०.२०२५ रोजी स्थागुशाचे पथकाने गुन्हयात सहभागी निष्पन्न झालेले अजुन ०४ आरोपी अटक करून तपास कामी तपास अधिकारी यांचे ताब्यात देण्यात आले आहे. त्यांची नावे खालील प्रमाणे (५) रोहीत गजानन पराते रा. पार्वती नगर, बाळापुर नाका, अकोला (६) अमोल अजाबराव उन्हाळे रा. हरीहरपेठ, जुने शहर, अकोला (७) नारायण गणेश मेसरे रा. बाळापुर जि. अकोला (८) आकाश बाबुराव शिंदे रा. भौरद जि. अकोला. यातील आरोपी कमांक (५) व (६) यांना स्थागुशा पथकाने अहील्यानगर येथुन ताब्यात घेतले तसेच आरोपी कं. (७) यास बाळापुर येथुन ताब्यात घेवुन आरोपी क्रमांक (८) यास अकोला रेल्वे स्टेशन येथुन ताब्यात घेण्यात आले. अशा प्रकारे गुन्हयातील आठ आरोपी आतापर्यतं अटक असुन एक आरोपी नामे शिवा रामा माळी हा अदयाप फरार आहे. लवकरच त्याला अटक करण्याची तजवीज ठेवली असुन तपास सुरू आहे.सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन पाटील, स्थानीक गुन्हे शाखा प्रमुख पो. नि. शंकर शेळके, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गोपाल ढोले, पोउपनि गोपाल जाधव पोलीस अमंलदार शेख हसन, रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलीये, वसीमोंददीन, मोहम्मद एजाज, किशोर सोनोने, भास्कर धोत्रे, खुशाल नेमाडे, गोकुळ चव्हाण, सुल्तान पठाण, उमेश पराये, आकाश मानकर, अभिषेक पाठक, मो. आमीर, राज चंदेल, श्रीकांत पातोंड, सतिष पवार, स्वप्नील खेडकर, अशोक सोनवणे, अन्सार अहमद चालक प्रशांत कमलाकर, मनीष ठाकरे, विनोद ठाकरे यांनी केली.





