जांभा खुर्द येथील इ क्लास जमीनीवरील अतिक्रमण तात्काळ काढा..राजु वानखडे…

0
3

मुर्तिजापूर दि.27..तालुका प्रतिनिधी.. तालुक्यातील जांभा खुर्द येथील इ क्लास जमीनीवरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे यासाठी जांभा खुर्द येथील माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य राजू साहेबराव वानखडे यांनी दि.27 आक्टोबर सोमवारी सकाळी 10 वाजता पासुन साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे.जो पर्यंत इ क्लास जमीनीवरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात येणार नाही तो पर्यंत हे उपोषण सुरूच राहणार आहे अशी माहिती राजु वानखडे यांनी दिली आहे.मागील तिन वर्षांपासून लेखी निवेदने, तक्रारी, उपोषण करून सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन व अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्याने नाईलाजाने उपोषण करावे लागत आहे.यामध्ये ग्रामसेवक हलगर्जीपणामुळे हे काम थंड बस्त्यात सापडले आहे.अनेकदा इ क्लास जमीनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न केले पण प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.समाधान होईपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार आहे.दिलेल्या निवेदनात नमूद आहे की समाधान सुदाम मोहोड यांचे ई क्लास जमीनीवरील अतिक्रमण संदर्भात दोन नोटीस, दवंडी दिल्यावरही यांनी अतिक्रमण केले आहे.व या संदर्भात तहसीलदार मुर्तिजापूर यांच्या तर्फे तीन वेळा नोटीस बजावण्यात आली पण ग्रामपंचायत जांभा खुर्द यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.जिल्हा परीषद शाळेसमोरील मुख्य चौकातील व जिल्हा परिषद शाळेच्या मागील श्मशाऩभुमी करीता राखीव जागेवरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे, कैलास एकनाथ पेटकर यांना 500 चौक.फु.जागेचे नियमाकुल करून केलेला नमुना 8 त्वरीत रद्द करण्यात यावे व त्यांनी तहसील मध्ये चलान भरली नसल्यामुळे व त्यांचे नाव नियमानुसार अतिक्रमण धारकांच्या यादीत घेतले नाही तरी त्यांचे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र मुंदे यांनी यांनी अप्पर आयुक्त यांच्या आदेशानुसार नवीन गावठाण मोजणी करण्याकरिता भुमी अभिलेख कार्यालय येथे नियमात अर्ज सादर केला नाही.अरज हा आॅनलाईन करून भरावयाचा होता.पण अजुनपर्यंत भुमी अभिलेख कार्यालय मुर्तिजापूर यांनी चार महिने उलटून गेले पण काहीच कार्यवाही केली नाही.त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर अप्पर आयुक्त अमरावती यांचे आदेशानुसार योग्य पालन न केल्याने महाराष्ट्र शासकीय कर्मचारी अधिनियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी.व तात्काळ भुमी अभिलेख मार्फत करण्यात यावी.प्रशासनाने या गंभीर बाबींची दखल न घेतल्यास आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे.अशी माहीती जांभा खुर्द येथील माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य राजू साहेबराव वानखडे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here