राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक महासचिव आ.संजय खोडके यांचा ग्रामीण कार्यकर्त्यांशी संवाद

0
2

प्रबळ, सक्षम व सर्वसमावेशक असा निवडून येणारा उमेदवार निश्चित करण्याचे आवाहनअमरावती जिल्हा परिषद, नगरपालिका व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीतून मंथनअमरावती

(प्रतिनिधी) दि. २६ ऑक्टोबर – महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून लढलो असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील परिस्थिती वेगळी आहे. अमरावती जिल्ह्यात आगामी निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले असून कमी कालावधी उरला आहे. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्षाला नवी ताकद व बळ द्यायचे आहे. यासाठी आतापासूनच जोमाने तयारीला लागून निवडणुका जिंकायच्या आहेत. कुठल्या जागांवर स्वबळावर लढायचे, कुठे युती करायची अथवा मैत्रीपूर्ण लढत करायची, यासंदर्भात स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा लागणार आहे. ही जबाबदारी स्थानिक नेतृत्वाने घेऊन एक प्रबळ, सक्षम व सर्वसमावेशक असा निवडून येणारा उमेदवार निश्चित करावा. यासाठी सर्वांनी मोठ्या ताकदीने व जोमाने कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक महासचिव आमदार संजय खोडके यांनी केले.आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक महासचिव आमदार संजय खोडके यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी अमरावती जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत मार्गदर्शन करताना आ. संजय खोडके यांनी सांगितले की, अमरावती जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा मानणारा व राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उप-मुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविणारा मोठा जनाधार आहे. मात्र, याचे रूपांतर मतांमध्ये होताना दिसत नाही. याबाबत चाचपणी केली असता आपल्याकडे प्रबळ, सक्षम व बलाढ्य असे उमेदवार नसल्याने आपण निवडणुकांमध्ये कधीही ७ ते १० जागांच्या वर पोहोचलो नाही. आता कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बळ द्यायचे आहे. यासाठी आगामी निवडणुकांमध्ये इच्छुक असलेले व निवडून यायचे प्रबळ दावेदार असणारे उमेदवार देखील आपल्याला शोधायचे आहेत. यासाठी सर्व तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले सर्कल अथवा गणमध्ये बारकाईने आढावा घेतल्यास उमेदवार निश्चित करणे सोपे जाईल. काही जागांवर आपण मजबूत असू तर काही तुल्यबळ लढत होईल, मात्र या निवडणुकीत आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कामगिरी सुधारावयाची असल्याचे सांगून आमदार संजय खोडके यांनी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण केला.तत्पूर्वी या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक महासचिव आमदार संजय खोडके यांनी अमरावती जिल्हा परिषदेच्या ५९ सर्कल, ११ नगर पालिका व ११८ पंचायत समितीच्या गणांबाबत सविस्तर आढावा घेतला.महिला पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शनबैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी सुरेखाताई ठाकरे यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी निर्णायक असून आपल्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही. म्हणून पक्षाने स्थानिक उमेदवाराला बळ देण्याची विनंती केली.पक्षाची तयारी आणि पोषक वातावरणप्रास्ताविक करताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे यांनी अमरावती ग्रामीण भागात कार्यकर्त्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर विजयी होण्यासाठी पक्षाची तयारी असून पोषक वातावरण असल्याचे सांगितले.या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा ग्रामीणचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष तसेच माजी नगराध्यक्ष व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.बॉक्स १प्रत्येक आव्हानांना सामोरे जाऊन निवडणुका जिंकायच्या आहेत – आ. सौ. सुलभाताई खोडकेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा ग्रामीणच्या बैठकीला उपस्थित अमरावती विधानसभा मतदार संघाच्या आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, निवडणुका या निवडणुकांसारख्याच झाल्या पाहिजेत, आपल्याला राष्ट्रवादीची ताकद वाढवायची आहे. निवडणुकांसाठी साधारणतः एक-दीड महिना हाती असल्याने आपण युती किंवा आपल्या समोर कोणत्या बलाढ्य पक्षाचे आव्हान आहे, किंवा त्याच्यासमोर आपण तग धरू की नाही, महाराष्ट्राच्या निवडणुकीत युती म्हणून सोबत काम केले आता मात्र एकमेकांसमोर उभे ठाकलो आहोत, असा कुठलाही विचार अथवा संभ्रम कार्यकर्त्यांनी बाळगू नये. निवडणुकीत विरोधकांचे आव्हान असेल, कुणी साम-दाम-दंड-भेद देखील वापरेल, परंतु कार्यकर्त्यांनी न डगमगता, मोठ्या हिमतीने या निवडणुकांना सामोरे जाण्याचे आवाहन ज्येष्ठ नेत्या आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here