आपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस स्टेशन हिवरखेड पोलीसांनी मोठा घातक शस्त्र साठा जप्त करुन एकुण १६३०० /- रुपयाचा मुददेमाल हस्तगत केला.

0
7

मा. श्री. अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला, यांचे निर्देशा प्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैदयरित्या शस्त्र बाळगणा-या लोकांचा समुळ उच्चाटन करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहिम राबविण्यात आली.पोलीस स्टेशन हिवरखेड जि. अकोला येथे दिनांक २८.१०.२०२५ रोजी पोलीस स्टेशन हिवरखेड पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की, हिवरखेड शहरातील लकी कॉलनी मधील आरोपी नामे समीरोददीन शरीफोददीन, व आरोपी नामे शरीफोददीन इकामोददीन यांनी त्यांच्या राहत्या घरात अग्नीशस्त्र व धारदार लोखंडी शस्त्र अवैदयरित्या लपवुन ठेवले आहे अशी गोपनिय माहिती मिळाल्याने पोस्टाफच्या मदतीने वर नमुद आरोपीतांच्या बंद घराची पंचाचे समक्ष झडती घेतली असता सदर घरातील एका खोलीमध्ये कोप-यात ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या टाकीमध्ये १) एका स्टिलच्या धातु सारखी धारदार तलवार, ज्याची अं. किं. ५००/-रुपये, २) एक लोखंडी पटटयाची धारदार तलवार, ज्याची किं. अं. ४००/-रुपये, ३) एक धारदार लोखंडी पात्याची तलवार, ज्याची किं.अं.४००/-रुपये, ४) एक पिस्टल मॅगझीनसह, ज्याची किं.अं.१५,०००/-रुपये असा एकुण १६,३००/-रुपयाचा मुददेमाल जप्त करुन नमुद आरोपीतांविरुध्द अपराध क्रमांक २८३/२०२५ कलम ३,४/२५ शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, श्री. अर्चित चांडक साहेब तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. रेड्डी सा., उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोट श्री. निखील पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड, पोहेकों प्रमोद चव्हाण, पोहेकॉ पंकज मडावी, पोकों अमोल बुंदे, पोकों आकाश गजभार, पोकों प्रमोद भोंगळ, मपोकों नेहा सोनोन यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here