दर्यापूर नगरपरिषदेसाठी ईश्वर खंडारे यांनी काँग्रेस पक्षाकडे इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल

0
6

दर्यापूर शहरातील मातंग समाजाचे युवा नेतृत्व असणारे ईश्वर रमेशराव खंडारे यांनी दर्यापूर नगरपरिषद अनुसूचित जाती (राखीव) प्रभाग क्रमांक ७ मधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, काँग्रेस पक्षाकडे इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी आपला अर्ज दर्यापूर तालुकाध्यक्ष श्री. सुधाकरभाऊ भारसाकळे पाटील यांचे व शहर अध्यक्ष अतिष शिरभाते यांच्या कडे सादर केला आहे. कारण त्यांनी युवक काँग्रेसमध्ये अनेक आंदोलने अनेक कार्यक्रम मध्ये सहभाग घेतला आहे युवक काँग्रेसच्या माध्यमातून डोअर टू डोअर कॅम्पिंग सुद्धा केली आहे. अनेक युवक काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी असताना सुद्धा त्यांनी कुठल्याही पदाची जबाबदारी दिली नाही तरीही पदावर न राहता समाजाचे कार्य समाजकार्याच्या माध्यमातून करेल व काँग्रेस पक्षाचे विचार प्रत्येकाच्या मनामध्ये या माध्यमातून पोचवेल असे त्यांचे विचार आहेत.ईश्वर खंडारे हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सक्रिय आहेत. कोणताही प्रसंग असो, गरजूंना मदतीचा हात देण्याची त्यांची तयारी नेहमीच दिसून आली आहे. समाजसेवेच्या या अनुभवातून ते आता काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून थेट लोकसेवा करण्यास उत्सुक आहेत.प्रभाग क्रमांक ७ मधील नागरिक त्यांना नगरसेवक म्हणून पाहू इच्छित आहेत. त्यांच्या साध्या, आपुलकीच्या आणि सर्वसमावेशक स्वभावामुळे युवक, महिलावर्ग आणि वरिष्ठ नागरिक यांच्यात त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईश्वर खंडारे यांनी सांगितले की,“ईश्वर खंडारे यांचे उद्देश प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणे आहे. रस्ते, नाले, पाणीपुरवठा, वीज आणि स्वच्छता घरकुल यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी लढा देत नागरिकांचा खरा आवाज नगरपरिषदेपर्यंत पोहोचवण्याचा ईश्वर खंडारे यांचा प्रयत्न असेल.”स्थानिक पातळीवर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आणि प्रभागातील नागरिकांमध्ये ईश्वर खंडारे यांना उमेदवारी मिळावी अशी जोरदार मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here