
सामाजिक बांधिलकी आणि कर्मचारी वर्गाच्या सहभागातून हरित उपक्रम यशस्वी!
मूर्तीजापुर (प्रतिनिधी): मूर्तीजापुरच्या कर्तव्यदक्ष व संवेदनशील तहसीलदार श्रीमती शिल्पाताई बोबडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपणाचा सुंदर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. गेल्या तीन वर्षांपासून तहसीलदार बोबडे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयावर आलेल्या नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण केले जात आहे, यामुळे त्या मूर्तीजापुर तालुक्यात एक ‘नामांकित तहसीलदार’ म्हणून ओळखल्या जातात.वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा भाग होता. केवळ प्रशासकीय कामकाज न पाहता, निसर्गावर प्रेम करणाऱ्या तहसीलदार मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यालयातील सर्व स्टाफ आणि वृक्षप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन हा उपक्रम साजरा केला.
यावेळी तहसीलदार श्रीमती शिल्पाताई बोबडे यांच्या शुभहस्ते एक झाड लावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांनी पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले. झाडे लावणे आणि त्यांची काळजी घेणे ही काळाची गरज असून, प्रत्येकाने या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.कर्मचारी वर्गाचा सक्रिय सहभागया सुंदर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालयातील स्टाफ कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले.
विशेषतः, श्री. संजय इसाळकर (सहायक महसूल अधिकारी), श्री. श्रीकांत नागरे, आणि श्री. निलेश खाडे, अशोक वाकोडे, यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेऊन, हा वृक्षारोपण सोहळा अतिशय नियोजनबद्धरित्या पार पाडला. त्यांच्या मेहनतीमुळेच तहसील कार्यालयात एक सुंदर ‘ग्रीन’ उपक्रम यशस्वी झाला.
कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या लोकप्रिय आणि कार्यक्षम मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, त्यांच्या वृक्षप्रेमाला सलाम केला. दरवर्षी प्रमाणे यंदाही झाड लावून वाढदिवस साजरा करण्याची ही ‘ग्रीन’ परंपरा मूर्तीजापुर तहसील कार्यालयाने कायम ठेवत एक सुंदर आणि प्रेरणादायी संदेश दिला आहे.








