दर्यापूर प्रभाग ८ मधून वुशाली ठाकरे यांना उमेदवारीची मागणी

0
5

दर्यापूर, (तालुका प्रतिनिधी): अमोल चव्हाण दर्यापूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ (ओपन महिला) मधून महिला मुक्ती मोर्चाच्या उपाध्यक्ष सौ. वुशाली आदेश ठाकरे यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी प्रभागातील प्रमुख कार्यकर्त्यांनी व महिलांनी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष माननीय श्री. सुधाकर पाटील भारसाकळे यांच्याकडे केली आहे. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत!कार्यकर्त्यांनी श्री. भारसाकळे यांच्याकडे निवेदनाद्वारे सांगितले की, सौ. वुशाली ठाकरे या केवळ पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या नाहीत, तर त्या आपल्या प्रभागात महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. अनेक गरजू महिलांना त्यांच्या माध्यमातून मदत मिळाली असून त्यांचा प्रभागातील महिलांशी असलेला थेट आणि मजबूत जनसंपर्क पक्षाच्या विजयासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.कार्यकर्त्यांनी मागणी केल्यानंतर, तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांनी पक्षश्रेष्ठींकडे ही मागणी सकारात्मकपणे मांडण्याचे आश्वासन दिले असून, सौ. वुशाली आदेश ठाकरे या इच्छुक उमेदवार असल्याने त्यांच्या नावाचा विचार पक्ष निश्चित करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.यावेळी यांची होती उपस्थिती:तालुका अध्यक्षांना निवेदन सादर करताना महिला कार्यकर्त्यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने महिला जिल्हाध्यक्षा सौ. संगीताताई इंगळे, सूलोचनाताई बडे, कविताताई होमे, कोकीळताई पोहकार, शेहनाल वशीम शाह, रुकसाना बेग, सारिकाताई मेशराम, शारदाताई खंगार, सूलिताताई मेशराम, मयूरीताई मेशराम, वनिताताई खंगार, जोशनाताई चैव्हान, देवकाताई चैव्हान, दिपालीताई डोके, टिपाताई इंगळे आणि चंदाताई पीठे यांचा समावेश होता.यावेळी पुरुष कार्यकर्त्यांमध्ये आदेश ठाकरे, वशिम शहा, अमर ठाकरे, बाळू इंगळे, सतीश इंगळे आणि महिला मुक्ती मोर्चाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here