

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.30 वाजता पोलिस मुख्यालयातून धावणार ‘एकता दौड
अकोला : “सजग, सक्षम आणि सुरक्षित” या घोषवाक्याखाली अकोला जिल्हा पोलिसांच्या ‘मिशन उडाण’ उपक्रमांतर्गत ‘रन फॉर युनिटी’ या विशेष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त हा उपक्रम 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता पार पडणार आहे. ही धाव पोलिस मुख्यालय, सरकारी बगीचा, कलेक्टर ऑफिस, अशोक वाटीका, पोलीस अधीक्षक कार्यालय, लक्झरी स्टँड आणि पुन्हा पोलिस मुख्यालय असा अंदाजे 3 किलोमीटरचा मार्ग पार करणार आहे. अकोला पोलिस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी खालील लिंकवर नोंदणी करावी असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे —https://forms.gle/9J88Ze4Vt1eDCUMT या मॅरेथॉनद्वारे एकता, देशभक्ती आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देत अकोला पोलिस समाजात सजगता आणि सक्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.30 वाजता पोलिस मुख्यालयातून धावणार ‘एकता दौड
 
		

