
मूर्तिजापूर / अकोला जिल्हा:वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजात आंबेडकर यांच्याकडे मूर्तिजापूर तालुक्यातील मातंग समाजाने लाखपुरी जिल्हा परिषद सर्कल मधून गजानन तायडे यांना उमेदवारी देण्याची विनंती केली आहे. मातंग समाजाला राजकीय न्याय देण्याच्या भूमिकेतून ही मागणी करण्यात येत आहे.आजपर्यंत मातंग समाजाला खऱ्या अर्थाने फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ अशा विचारांच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळालेला नाही, तो न्याय सुजात आंबेडकर यांच्याकडून निश्चित मिळेल, अशी अपेक्षा मातंग समाज व्यक्त करत आहे.गजानन तायडे हे अण्णाभाऊ साठे क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष तसेच वंचित बहुजन आघाडीचे पूर्ण कालीन प्रचारक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ते सातत्याने सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पक्षाचे कार्य बळकट करत आहेत.
संपूर्ण मूर्तिजापूर मातंग समाजाची मागणी आहे की, गजानन तायडे यांनाच लाखपुरी सर्कलसाठी उमेदवारी मिळावी. तायडे हे लाखपुरी सर्कल मधून वंचित बहुजन आघाडीसाठी समाजाचे इच्छुक उमेदवार असून, पक्षप्रमुखांनी या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देतील अशी प्रार्थना समाजाकडून करण्यात आली’वंचित बहुजन आघाडी हा वंचितांचा पक्ष आहे खऱ्या अर्थाने मातंग समाजा वंचित आहे. आरएसएस व भाजपने मातंग समाजाला आजपर्यंत वंचित बहुजन आघाडी विषयी मोठे गैरसमज निर्माण केले होते. हे पुसून काढण्याच्या उद्देशाने मध्यंतरी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या सप्ताहात गजानन तायडे यांच्या नेतृत्वाखाली तेरा दिवसांची ‘मातंग समाज संघर्ष यात्रा’ जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. यामुळे समाज विश्वास निर्माण करण्यात आले.
आता या महत्त्वपूर्ण विषयाकडे वंचित बहुजन आघाडी लक्ष देऊन मातंग समाजाला गजानन तायडे यांच्या रूपाने न्याय देणार का, याकडे संपूर्ण समाजाचे अशापूर्ण लक्ष लागलेले आहे असे समाजातून दिसून येते.







