
शास्ती व्याजावर 100% सूट! व शास्ती व्याजाला मुदत
मूर्तिजापूर: मूर्तिजापूर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासा देणारी आणि महत्त्वाची बातमी आहे. नगरपरिषदेने थकीत मालमत्ता करावरील शास्ती व्याजावर 100% टक्के सूट देणारी “अभय योजना” लागू केली आहे. या योजनेत मूर्तिजापूर नगरपरिषदेचा समावेश झाल्यामुळे हजारो नागरिकांना त्यांच्या थकीत करावरील शास्ती माफ करून घेण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.अभय योजनेची मुख्य वैशिष्ट्ये: थकीत मालमत्ता करा वरील मालमत्ता करावरील शास्ती व्याज दरमहा 2% पूर्णतः माफी…** सवलत: थकीत मालमत्ता करावरील शास्ती व्याजावर 100% सूट मिळणार. * मुदतवाढ: या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता दिनांक 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (पूर्वी 20 ऑक्टोबरपर्यंत मुदत होती.) * लाभ घेण्याची प्रक्रिया: थकित मालमत्ता धारकांनी दरमहा 2% शास्ती/व्याजाची रक्कम वगळून थकित रक्कमेचा भरणा करून 14/11/2025 पर्यंत कर भरणा करणे आवश्यक आहे. *माजी उपनगराध्यक्ष सुनील पवार यांच्या पाठपुराव्याला यश व शास्ती व्याजाला मुदतवाढ 14 नोव्हेंबर पर्यंत !* राज्यातील महानगरपालिकांच्या धर्तीवर मूर्तिजापूर नगरपरिषदेतही ही योजना लागू व्हावी, यासाठी माजी नगरपरिषद उपनगराध्यक्ष सुनील महादेराव पवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला अखेर यश मिळाले आहे. थकित मालमत्ता कर भरणा, शास्तीवाजाची माफी व शास्ती व्याजाला मुदतवाढ नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वृत्तपत्र व सोशल मीडिया माध्यमातून करण्यात आले आहे.सुनील पवार यांनी सांगितले की
,> “ज्या प्रकारे राज्यातील महानगरपालिकांमध्ये अधिनियम कलम 51 अंतर्गत शास्ती माफीकरिता अभय योजना राबविण्यात आली होती, तशीच अभय योजना महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 150 (अ). 1 नुसार आता शास्ती व्याज माफी मूर्तिजापूर नगरपरिषदने लागू करण्यात आली आहे. थकीत करावरील शास्ती व्याज माफ करण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी श्री टाले साहेब, माननीय आमदार हरीश भाऊ पिंपळे आणि तत्कालीन सह आयुक्त नगरपरिषद प्रशासक अकोला श्री विजय लोहकरे साहेब यांनीही शासन दरबारी कागदपत्रांचा पाठपुरावा केला. या सामूहिक प्रयत्नांमुळेच नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येत आहे. त्यामुळे नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.”>
शासकीय निर्णयानुसार योजनेची अंमलबजावणीराज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या क्षेत्रातील मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 150 (अ) 1 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार आणि शासन निर्णय क्रमांक: एमयुएम-2025/प्र.क्र. 70/नवि-17 नुसार मूर्तिजापूर नगर परिषदेत अभय योजना लागू करण्यात आली आहे. नागरिकांसाठी सुट्टीच्या कालावधीत व नंतरही शासकीय सेवा उपलब्ध राहाव्यात यासाठी माझी उपनगराध्यक्ष सुनिल महादेवराव पवार यांनी मुर्तिजापूर नगर परिषदे कडे व नगरपरिषदेने शासनाकडे विशेष पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे थकीत( मालमत्ता ) धारकांनी तातडीने नगरपरिषदेच्या कर विभागाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा.
नागरिकांसाठी आवाहन आहे की, त्यांनी 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत थकीत कर 2% दरमहा. शास्ती व्याजाच्या १००% माफीचा लाभ घ्यावा.






