
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :- नरेश राऊत झाडगाव:येथील जय गजानन मंडळ झाडगाव ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य निधा या छोट्याशा गावात वास्तव्य करणारे राष्ट्रसंताच्या विचाराने प्रेरणा घेऊन गेल्या पंचवीस वर्षापासून सतत तुकडोजी महाराजांच्या विचाराची पताका खांद्यावर घेऊन खेडोपाडी आणि झाडगाव परिसरातील पंचक्रोशी मध्ये सतत कार्य मग्न राहणारे एक प्रभावी व्यक्तिमत्त्व माननीय डॉक्टर साहेब मुडे यांची निवड अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या केंद्रीय प्रचार समितीमध्ये सचिव या पदावर झाली.एका ग्रामीण भागापासून गुरुदेव प्रचाराची सुरुवात करून आपण या पदापर्यंत पोहचता आलं याच एकमेव कारण म्हणजेच यांची इमानदारी आणि एकनिष्ठ असणं,ही सर्व गुरुदेव सेवकां करीता फार आनंदाची आणि राळेगाव तालुक्यातील जनते करिता अभिमानाची बाब आहे.







