
महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकीची घोषणा झाली असून मूर्तिजापूर शहरातही राजकीय तापमाना मध्ये वाढ झाली आहे. या आगामी मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकी मध्ये माजी सभापती सिंधुताई दामोदर मोहोड यांचे चिरंजीव राजेंद्र दामोदर मोहोड हे नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.मूर्तिजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकी साठी राजकीय हालचालींना वेग आला असून राज्य सरकारने ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी नगरपरिषदेच्या मतदारांची अंतिम यादी जाहीर केल्यानंतर मूर्तिजापूर शहरात निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण वर्गासाठी खुले असल्याने सर्व पक्ष आणि संभाव्य उमेदवार सक्रिय झाले आहेत. मतदारांशी भेटीगाठी, संवाद, आणि प्रचार यांची सुरुवात झाली असून या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकी मध्ये राजेंद्र मोहोड हे संभाव्य नगराध्यक्षपदाचे दावेदार ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ते मूर्तिजापूर नगरपरिषदेच्या माजी सभापती सिंधुताई दामोदर मोहोड यांचे पुत्र असून, शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा चांगला प्रभाव असून संपूर्ण शहरा मध्ये त्यांना जवड पास सर्वच मतदार ओळखतात व ते नेहमीच नागरिकांच्या समस्या सोडवण्या करिता सक्रिय असतात.तसेच प्रभाग ८ मधून सौं. पुष्पाताई मोहोड निवडणूक रिंगणात या मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकी मध्ये प्रभाग क्रमांक ८ हा सर्वसाधारण महिला राखीव असल्याने, मूर्तिजापूर नगरपरिषदेच्या माजी पाणीपुरवठा सभापती सौं. पुष्पाताई चंद्रशेखर मोहोड प्रभाग ८ किंवा प्रभाग ३ मधून सदस्यपदासाठी निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत.स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, पुष्पाताई मोहोड यांनी नगरपरिषदेच्या विकासकामांमध्ये सक्रिय भूमिका बजावल्यामुळे, त्यांचा महिलांमध्ये चांगला संपर्क आणि जनाधार आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकी मध्ये महिला मतदारांचं लक्ष या प्रभागाकडे वळण्याची शक्यता आहे.समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.तसेच राजेंद्र मोहोड यांच्या उमेदवारीच्या चर्चेनंतर मूर्तिजापूर शहरात त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, “राजेंद्र मोहोड यांनी शहरातील नागरिकांसाठी अनेक सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी त्यांची उमेदवारी नैसर्गिक आणि योग्य आहे.”असे शहरातील सामान्य नागरिकांचे मान्य आहे व पुष्पाताई मोहोड यांच्या समर्थकांनीही विश्वास व्यक्त केला आहे की, “त्या नेहमीच जनतेशी थेट संपर्कात राहून त्यांच्या अडचणी सोडवतात. प्रभागात महिलांमध्ये त्यांचा मोठा जनाधार आहे.”या मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या कालावधी मध्ये मूर्तिजापूर शहरातील स्थानिक राजकारणाला नवा रंग चढला आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अनेक नवीन चेहरे आणि अनुभवी कार्यकर्ते मैदानात उतरण्याची शक्यता आहे.राजेंद्र मोहोड यांनी अध्यक्ष पदाची निवडणूक लढल्यास मूर्तिजापूर नगरपरिषदेची निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे समजते…







