
लाखपुरी: जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाखपुरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून एका तडफदार आणि तरुण चेहऱ्याची जोरदार चर्चा आहे. पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष श्रीनेश जानराव धामणे यांनी या सर्कलमधून आपली उमेदवारीची इच्छा व्यक्त केली असून, त्यांच्या नावामुळे लाखपुरी सर्कलमध्ये एक नवा उत्साह संचारला आहे. तरुण, उत्साही नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वासश्रीनेश धामणे हे त्यांच्या उत्कृष्ट जनसंपर्क, सामाजिक उपक्रम आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने घेतलेल्या भूमिकेमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि लाखपुरी सर्कलमध्ये एक ‘प्रभावी युवा नेतृत्व’ म्हणून ओळखले जातात. तरुण आणि उत्साही कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर मोठा विश्वास असून, ‘तरुण नेतृत्वाचा आवाज आता जिल्हा परिषदेत घुमावा,’ असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.लोकाभिमुख दृष्टीकोन आणि विकासाची तळमळधामणे यांचा सकारात्मक दृष्टीकोन, लोकाभिमुख विचारसरणी आणि विकासाभिमुख कार्यशैली यामुळे त्यांच्या उमेदवारीला गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मार्गदर्शनाखाली लाखपुरी सर्कलच्या जनतेच्या हितासाठी काम करण्याची त्यांची तळमळ स्पष्ट दिसून येत आहे.’गुड न्यूज’ – तरुणाईचा उत्साह वाढलाश्रीनेश धामणे यांच्या उमेदवारीमुळे लाखपुरी सर्कलमध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाची बाजू अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास स्थानिक नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह, त्यांची ऊर्जा आणि लोकाभिमुख विचार यामुळे श्रीनेश धामणे यांच्या रुपाने लाखपुरीला एक प्रभावी आणि सक्रिय प्रतिनिधी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.






