
दर्यापूर, (प्रतिनिधी): अमोल चव्हाण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथील प्रभाग क्रमांक ३ मध्ये २८ नोव्हेंबर रोजी निवडणूक बूथचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ चौरपगार हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये साबीर भाई कुरेशी, खैराती भाई कुरेशी आणि कदीर बेग यांचा समावेश होता.यावेळी प्रभाग क्रमांक ३ मधील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार जुबेर बेग (सर्वसाधारण पुरुष) आणि रविना ताई सुनील गवई (अनुसूचित जाती महिला) यांना उपस्थित मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल गजभिये सर यांनी केले.अध्यक्षीय भाषणात संजय भाऊ चौरपगार यांनी दोन्ही उमेदवारांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “तळागाळातील सामान्य माणसाला सत्तेच्या प्रवाहात आणणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे हाच वंचित बहुजन आघाडीचा मूळ संकल्प आहे. हा संकल्प सिद्ध करण्यासाठी कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकजूट दाखवावी.”बूथच्या या उद्घाटनप्रसंगी प्रभागातील नागरिक आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..







