
दर्यापूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दर्यापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मा. श्री. सुधाकर पाटील भारसाकळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.उपस्थितांमध्ये खालील मान्यवरांचा समावेश होता: * मंदाकिनीताई सुधाकर भारसाकळे (भावी नगराध्यक्षा) * आतिश भाऊ शिरभाते (दर्यापूर शहर व काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष) * ईश्वर भाऊ बुदिले (अमरावती जिल्हा काँग्रेस महासचिव) * माजी नगरसेवक रामेश्वर भाऊ चव्हाण * शिवाजी भाऊ देशमुख * उद्धवराव नळकांडे * असलम भाय घानिवाले * रामेश्वर भाऊ ताडेकर * नितीन भाऊ गावंडे * असलम मंजुरी * अजय भाऊ देशमुख * राहुल भाऊ गावंडेयावेळी सर्व उपस्थितांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला आणि विचारांना आदराने वंदन केले






