
मुंबई: नगर पंचायती आणि नगर परिषदांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग (State Election Commission) पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागला आहे. जिल्हा परिषदांच्या (ZP) निवडणुका महानगरपालिकांसोबत (Municipal Corporations) एकत्र घेण्यावर आयोग चाचपणी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मनुष्यबळ आणि ईव्हीएम (EVM) उपलब्ध
आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्र घेण्याइतपत मनुष्यबळ आणि ईव्हीएम यंत्रे उपलब्ध आहेत. यामुळे प्रशासनावरील आणि खर्चावरील ताण कमी होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद आरक्षणाचा प्रश्नजिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये आरक्षण मर्यादेचा (Reservation Limit) प्रश्न असल्याने त्या निवडणुका दोन टप्प्यांत घेता येतील का, यावरही आयोगामध्ये विचारमंथन सुरू आहे. आरक्षणासंदर्भातील कायदेशीर बाबी तपासून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. हिवाळी अधिवेशनानंतर निर्णय अपेक्षितया सर्व बाबींविषयीचा अंतिम निर्णय विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) पार पडल्यानंतर घेतला जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आयोगाची तयारी सुरूराज्यातील एकूण २९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ नगर पंचायतींच्या निवडणुका भविष्यात होणार आहेत. यासाठी निवडणूक आयोगाने तयारीला सुरुवात केली आहे: * महापालिका मतदारयाद्यांचा आढावा: याच तयारीचा एक भाग म्हणून, राज्य निवडणूक आयुक्तांनी गुरुवारी महापालिकांच्या मतदारयाद्यांबाबत आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्तांची बैठक बोलावली आहे. अंतिम मतदारयादी: प्रारूप मतदारयाद्यांवर सूचना व हरकती दाखल करण्याची मुदत बुधवारी संपली आहे. १० डिसेंबरपर्यंत अंतिम मतदारयादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.







