
अमोल चव्हाण दर्यापूर:भारतीय बौद्ध महासभा दर्यापूर तालुका आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात भव्य मेणबत्ती मार्च (कँडल रॅली) काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून महामानवाला अभिवादन करून विनम्र मान वंदना देण्यात आली.हा मेणबत्ती मार्च शांततेने आणि शिस्तीने काढण्यात आला. यात मोठ्या संख्येने बौद्ध बांधवांनी सहभाग नोंदवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण केले.महत्त्वाच्या मान्यवरांची उपस्थितीयावेळी अनेक प्रमुख सामाजिक, राजकीय व आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने यांचा समावेश होता: * आद. मुरलीधर रायबोरडे (अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, दर्यापूर) * आद. विजय भाऊ चोरपगार (राज्य संघटक, भारतीय बौद्ध महासभा, अमरावती विभाग) * आद. साहेबराव वाकपाजर (जिल्हा महासचिव, वंचित बहुजन आघाडी, अमरावती) * आद. संजय भाऊ चोरपगार (जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, अमरावती) * आद. ॲड. संतोष भाऊ कोल्हे (माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ अधिवक्ता) * आद. ॲड. आम्रपाली आठवले (तालुका महिला अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी) * आद. संघमित्रा ताई आठवले (महिला तालुका अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, दर्यापूर) * आद. हिम्मतराव वानखडे (माजी शिक्षण अधिकारी, पंचायत समिती, दर्यापूर) एस एस डि संजय चोरपगार श्री नंद रायबोलै अरुण रायबोले नागोराव मोहोळ साहेबराव सावळे रामदास गवई आकाश गवई धिरज जामनिक 🤝 दर्यापूरवासीयांचा उत्स्फूर्त सहभागया यशस्वी उपक्रमासाठी राहुल सर गजभिये, राहुल भाऊ वाकोडे, संतोष भाऊ शिंदे, मोहन भाऊ अंभोरे, प्रविण भाऊ सावळे, सतिश भाऊ सावळे, करण भाऊ सावळे यांच्यासह दर्यापूर शहरातील सर्व बौद्ध बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.






