
पोलीस स्टेशन खदान जि. अकोला येथे फिर्यादी नामे वृषाली ललित सोने वय ४४ वर्ष रा. आरोग्य नगर, अकोला यानी दि. २८/०९/२०२५ रोजी फीर्याद दिली की, दि.२४/०९/२०२५ रोजी यातील नमुद मृतक नागे रूपाली अनिल खंडारे हीने गुन्हयातील आरोपी अनिल संपत खंडारे व त्याचे ०४ नातेवाईक यांनी घरगुती कारणावरूण शारीरीक व मानसिक त्रास देत असल्याने यातील मृतक महीला हीने त्यांच्या त्रासाला कंटाळुन स्वतःला जाळून घेतले. मृतक हीस उपचाराकरीता सरकारी दवाखाना, अकोला येथे भरती केले असता उपचारादरम्यान दि. २८/०९/२०२५ रोजी दुपारी ०४/०० वाजता मरण पावली वरून फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून पो स्टे खदान अकोला अप क ७७३/२०२५ कलम ८५,१०८,३ (५) भारतीय व्याय संहीता प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपासावर आहे.सदर गुन्हयातील आरोपी आरोपी अनिल संपत खंडारे हा पत्नी मृत झालेबरोबर फरार झाला होता. त्या दरम्यान त्याने अटक चुकविण्या करीता मा. उच्च न्यायालय येथे धाव घेतली होती परंतु मा. उच्च न्यायालय यांनी जामीन रदद करण्याचे आदेश दिले होते. आरोपी पोलीसांन अटक चुकविणे करीता पुणे, नाशिक, नांदेड, खामगांव अश्या वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. माहीती च्या अधारावर पथक महिती घेत होते परंतु आरोपी हा मिळून येत नव्हता, वेळोवेळी कोणच्याही संपर्क राहत नसल्यामुळे शोध घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या अशा परिस्थीती मध्ये पीडीताचे नातेवाईक यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेवुन परिस्थीती बाबत अवगत केले होते मा. पोलीस अधीक्षक यांनी या तपासा बाबात व आरोपी शोथ बाबत आवश्यक सुचना दिल्या त्यांनतंर पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गुप्त बातमीदाराकडुन माहिती घेवुन तसेच तांत्रीक विश्लेषण करून माहिती घेतली असता तो जि. नांदेड येथे आनंद नगर येथील समर्थ अपार्टमेन्ट येथे राहत असल्याची माहिती मिळाल्याने पथक रवाना करून आरोपी अनिल संपत खंडारे याचा शोथ घेतला असता नमुद आरोपी हा आनंद नगर नांदेड येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन खदान अकोला यांचे ताब्यात देण्यात आले आहे. अकोला पोलीसांच्या विशेष टीम व्दारे सततपाठपुरावा करून ६५ दिवसानंतर आरोपी अटक करून पीडीतेच्या नातेवाईकांना दिलासा दिला आहे.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक सा, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. बी. चंद्रकांत रेड्डी सा. यांचे मार्गदर्शना खाली पो.नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला सहा. पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पो. हवा. महेद्र मलीये, किशोर सोनाने, रविद खंडारे, वसीमोद्दीन, खुशाल नेमाडे राहुल गायकवाड, चालक पो. का देवानंद खरात, मनीष ठाकरे, यांनी केली.






