
प्रतिनिधी अमोल चव्हाण दर्यापूर: दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक, तसेच सहकारी नेते सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. * भव्य रक्तदान शिबिर: मंगळवार, दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कृषी भवन, दर्यापूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. * आयोजक: हे शिबिर आणि सामाजिक उपक्रम तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या वैष्णवी स्पोर्ट्स क्लब, दर्यापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत. * ग्रंथ तुला: कृषी उत्पन्न बाजार समिती, दर्यापूर यांच्या संचालक मंडळाच्या वतीने सुधाकर पाटील भारसाकळे यांची ग्रंथ तुला करण्यात येणार आहे.या रक्तदान शिबिरात तालुक्यातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.आवाहन करणारे मान्यवर: * डॉ. अविनाश ठाकरे * सुनील पाटील गावंडे (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, दर्यापूर) * आशिष भाऊ शिरभाते (अध्यक्ष, शहर काँग्रेस कमिटी, दर्यापूर)








