
उमई जांबा गावातून सर्पमित्र मुन्ना श्रीवास यांना सकाळी फोनवर माहिती मिळाली की गावातील शेताच्या धुर्यावर एक मोठा अजगर दिसून आला आहे. माहिती मिळताच मुन्ना श्रीवास फक्त १० मिनिटांत स्पॉटवर पोहोचले, हे ठिकाण मूर्तिजापुर पासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर आहे.घटनेस्थळी पोहोचल्यावर दिसले की अजगर हा शेताच्या धुर्यावर असलेल्या काटे व झुडपांमध्ये अडकलेला होता. परिस्थिती समजून घेत त्यांनी काळजीपूर्वक अजगराला त्या काट्यातून बाहेर काढले आणि सुरक्षितरित्या ताब्यात घेतले.तेथे उपस्थित ग्रामस्थांना मुन्ना श्रीवास यांनी अजगराच्या स्वभावाविषयी आणि वन्यजीव संरक्षणाविषयी महत्त्वपूर्ण माहिती देत जागृती केली.बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर अजगराला त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जंगलात सोडण्याची तयारी करण्यात आली आहे, जेणेकरून तो आपल्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित राहू शकेल.मुन्ना श्रीवास यांचे हे तात्काळ आणि धाडसी रेस्क्यू कार्य ग्रामस्थांसाठी दिलासा देणारे ठरले आहे.







