पोटगव्हाण विजेच्या करंट लागून बकरीचा जागीच मृत्यू

0
9

तालुका प्रतिनिधी पवन जाधव कळंब : तालुक्यातील पोटगव्हाण येथील एका बकरीचा वीज प्रवाहामुळे मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पोटगव्हाण येथे शनीवार दिनांक ०६डिसेंबर रोजी सकाळी ०९. ०० वाजता उघडकीस आली. रामाजी लक्ष्मण किनाके राहणार पोटगव्हाण तालुका कळंब असे शॉक लागून मृत्यू झालेल्या बकरी मालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोटगव्हाण येथील रामाजी लक्ष्मण किनाके शनिवारी सकाळी बकरी चरण्या साठी नेत होता बकरी चारा खाण्याकरिता गेली असता तिथे पोटगव्हाण येथे डी पी ला विधुत प्रवाह चालू असताना बकरीला विदयुत च्या पोलाचा स्पर्श झाल्यामुळे बकरीचा मृत्यू झाला परंतु विजेच्या प्रवाह जबर लागल्यामुळे बकरीचा जागीच मृत्यू झाला व बकरी पेट घेऊ लागली पोटगव्हाण चा डी. पी जवळ कोणतेही कंपाउंड नसून उघड्यावर आहे विधुत कंपनी चा भोंगळ कारभार उघड्यावर असल्याचे दिसून येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here