अकोला जिल्हा पोलीस दल सी.सी.टी.एन.एस. कार्यप्रणाली मध्ये महाराष्ट्र राज्यातुन सलग तिस-यांदा चौथा क्रमांकावर तर अमरावती परिक्षेत्रातुन प्रथम क्रमांकावर

0
8

पोलीस दलाच्या कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी सीसीटीएनएस (काईम कीमीनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टम) प्रणाली देश पातळीवर सुरू करण्यात आलेली आहे. यात पोलीस स्टेशन येथील अभिलेखांवी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी केली जाते. त्यामुळे सीसीटीएनएस प्रणालीत देशपातळीवरील गुन्हे व माहीती यामध्ये उपलब्ध होते. त्यामध्ये ई-तकार, अनोळखी मृतदेह शोधणे, गुन्हे प्रतिबंध कारवाई, वाहनांची पडताळणी करणे, गुन्हे उघडकीस आणणे आदी करीता ही प्रणाली महत्वाची ठरते.सीसीटीएनएस प्रणाली मध्ये पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हयांपासून ते तपास व दोषारोपपत्र इत्यादी २१ प्रकारची माहीती फॉर्म स्वरुपात नोंदी केल्या जातात. तसेच सिटीझन पोर्टलवर एफ.आय.आर. प्रकाशीत करणे व प्रत्येक महिन्याला प्राप्त होणा-या ई तक्रारींचे वेळेत निराकरण करुन निर्गती करणे आणि इतर पोलीस स्टेशन कडुन प्राप्त झीरो एफ.आय.आर. विहीत वेळेत दाखल करणे तसेच प्रतिबंधक कार्यवाही, बेल रीजेक्ट संबंधाने, पोलीस व्हेरीफीकेशन संबंधाने, सीसीटीएनएस प्रणालीचा उपयोग होतो व गुन्हे उघडकीस आणल्या बाबत सक्सेस स्टोरीची माहिती घटकाकडुन वरीष्ठ कार्यालय, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांना सादर करण्यात येते. तसेच सीसीटीएनएस संबंधीत देश पातळीवर कार्यान्वीत असलेले क्राईम मॅक पोर्टल व इटसो पोर्टल बाबत सुध्दा माहिती सादर करण्यात येते. नमुद माहिती संपुर्ण महाराष्ट्रातील घटकाकडुन वरीष्ठ कार्यालय, पुणे येथे सादर करण्यात येते. या सर्व बाबी वरीष्ठ कार्यालयाकडुन तपासुन घटकांना गुण देण्यात येवुन महावारी रॅकींग जाहिर करण्यात येते.गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पो. महासंचालक यांनी माहे ऑगस्ट २०२५ महीण्याचा अहवाल जाहीर केला असता त्यामध्ये एकुण ५३ घटकापैकी अकोला पोलीस दलाने २०१ गुणां पैकी १९६ गुण (९७. ५१%) प्राप्त करून सलग तिस-यांदा राज्यात चौथा क्रमांक तसेच अमरावती परीक्षेत्र, अमरावती विभागातुन प्रथम क्रमांक पटकावुन अकोला जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे.मा. श्री. अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांचे विशेषता योग्य मार्गदर्शन लाभले ज्यामध्ये घटकातील सीसीटीएनएस अंमलदार यांचे नियमीत प्रशिक्षण घेण्यात येवुन प्रशिक्षीत अंमलदार व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांचे वेळो वेळी सीसीटीएनएस प्रणाली संबधाने आढावा बैठकी आयोजीत करण्यात आल्या तसेच प्रत्येक गुन्हे परीषदे दरम्यान सीसीटीएनएस प्रणालीचा आढावा घेण्यात आला व पोलीस स्टेशन भेटी दरम्यान पोलीस स्टेशन येथील अडचणी सोडविण्यात येवुन कामकाजाचे योग्य व्यवस्थापन करण्यास मा श्री. अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच सीसीटीएनएस नोडल अधीकारी तथा अपर पो. अधीक्षक बी. चंद्रकांत रेडडी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोहेकॉ सतिश जयराम भातखडे, पोहेकॉ निखिल भाष्करराव सावळे, पोकॉ शुभम संजय सुरवाडे व मपोका सोनाली बळीराम राठोड यांनी यासाठी परीश्रम घेतले तसेच पोलीस स्टेशन व उपविभागीय स्तरावरील सीसीटीएनएस अंमलदारांचेही यामध्ये महत्वाचे योगदान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here