
मुर्तीजापुर : मुर्तीजापुर नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल येत्या २१ तारखेला लागणार असला तरी, मतदानाच्या पेटीत बंद झालेल्या अनेक गोष्टींच्या चर्चा शहरात रंगू लागल्या आहेत. ‘ज्वालादीप’च्या प्रतिनिधींनी केलेल्या सर्वेक्षणानंतर आणि जनतेच्या चर्चेतील सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणुकीतील काही रंजक आणि अनपेक्षित बाबी लवकरच जनतेसमोर येणार असल्याचं दिसत आहे

निवडणुकीत अनेक उमेदवार पक्षाच्या चिन्हावर लढले. सूत्रांच्या माहितीनुसार, काही उमेदवारांनी पक्षाच्या धोरणांवर आणि विचारांवर पूर्ण निष्ठा ठेवत काम केले. त्यांनी पक्षादेशाचे पालन करत, वरिष्ठ नेत्यांनी आखून दिलेल्या रणनीतीनुसार प्रचार केला. मात्र, त्याचवेळी काही ठिकाणी पक्षादेशाला बगल देत, केवळ स्वतःच्या नावावर आणि प्रभावावर जोर देणारे उमेदवारही दिसून आले, ज्यामुळे त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘एकला चलो रे’चा नारा कोणी दिला?या निवडणुकीतील सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे काही उमेदवारांनी दिलेला ‘एकला चलो रे’चा नारा.
चर्चेतील माहितीनुसार, काही उमेदवारांनी मतदारांना थेट आवाहन केले की, "मला मतदान करा, बाकीच मला काहीच करा लागत नाही."
या उमेदवारांनी पक्षाच्या सामूहिक प्रचारापासून काहीशी अंतर ठेवत, केवळ स्वतःच्या कामावर आणि जनसंपर्कावर लक्ष केंद्रित केले. या ‘एकला चलो रे’ धोरणाचा निवडणुकीवर काय परिणाम झाला, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
‘डमी’ पत्रकांचा गौप्यस्फोट!
सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणुकीत आणखी एक धक्कादायक बाब उघड होण्याची शक्यता आहे. काही अपक्ष उमेदवारांनी सत्ताधारी पक्षाच्या किंवा प्रमुख विरोधी पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांसोबत मिळून कथितरित्या ‘डमी’ प्रचारपत्रके छापल्याची चर्चा आहे. * या ‘डमी’ पत्रकांचा वापर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी किंवा विशिष्ट उमेदवाराला अप्रत्यक्षपणे मदत करण्यासाठी केला गेला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. * यामागे कोणता गट सक्रिय होता आणि त्यांचा नेमका उद्देश काय होता, हे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.ज्वालादीप’ लवकरच करणार मोठा खुलासा!’ज्वालादीप’च्या प्रतिनिधींनी सर्व प्रभागांमधून घेतलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आणि जनतेच्या गप्पांमधून समोर आलेली ही माहिती लवकरच सविस्तर स्वरूपात जनतेसमोर मांडली जाईल. कोणी कोणाचे काम केले, कोणाचे बंडखोरीचे डाव यशस्वी झाले, आणि ‘डमी’ पत्रकांचा वापर कोणी केला या सर्व गोष्टींचा लवकरच पर्दाफाश होणार आहे.२१ तारखेला निकाल जाहीर होण्यापूर्वी, मुर्तीजापुरच्या राजकारणातील हे पडद्यामागील नाट्य आता लवकरच उघड होणार आहे.








