अतिवृष्टीमुळे दर्जा घसरलेल्या सोयाबीनची खरेदी कापूस धोरणाप्रमाणे ‘ग्रेड’ नुसार करा; प्रगती शेतकरी मंडळाची पणन मंत्र्यांकडे मागणी, अन्यथा १ जानेवारी २०२६ पासून ट्रॅक्टरसह नाफेड केंद्रावर आंदोलनाचा इशारा!

0
14

मूर्तिजापूर (प्रतिनिधी):यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उत्पादनाचा दर्जा मोठ्या प्रमाणात घसरला असून, नाफेड (NAFED) द्वारे हमी भावाने (MSP) होणारी खरेदी अत्यंत मंद गतीने सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन घरात पडून असून त्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रगती शेतकरी मंडळाने (Pragati Shetkari Mandal) सोयाबीन खरेदीमध्ये कापूस खरेदी योजनेप्रमाणे ग्रेडिंग धोरण (दर्जानुसार खरेदी) लागू करून खरेदीचा वेग वाढवावा, अशी मागणी राज्याचे पणन मंत्र्यांकडे केली आहे.कापूस खरेदी धोरणाप्रमाणे खरेदीची मागणीप्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. ते म्हणाले, “कापूस खरेदी योजनेत कापसाला सुपर (Super), एफएक्यू (FAQ), आणि फेअर (Fair) अशा दर्जानुसार दर कमी ठरवून खरेदी केली जात होती. तेच धोरण राबवून सोयाबीनची खरेदी केल्यास बाजारातील मागणी वाढेल आणि खरेदीचा वेग वाढून शेतकऱ्यांचा माल लवकर विकला जाईल.”१ जानेवारीपासून नाफेड केंद्रावर ट्रॅक्टर घेऊन धडकणारवानखडे यांनी शासनाला इशारा दिला की, जर या मागणीला आणि शेतकऱ्यांच्या समस्येला त्वरित प्रतिसाद मिळाला नाही, तर १ जानेवारी २०२६ रोजी नोंदणी केलेले सर्व शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन नाफेड खरेदी केंद्रावर धडकतील आणि तीव्र आंदोलन करतील.या पत्रकार परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कैलास साबळे, जनमंच नागपूर, मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष प्रा. सुधाकर गौरखेडे, तसेच मुन्ना नाईकनवरे, नंदकिशोर बबानिया, गोपाल तायडे आणि अरुण बोंडे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here