
सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशाप्रकारे आहे की, पोलीस स्टेशन हददीमध्ये अवैधरीत्या मानवी आरोग्यास अपायकारक तसेच शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा विक्री करणारे इसमांवर कारवाई करण्याचे मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी आदेशीत केल्याप्रमाणे, आज दिनांक १३/१२/२०२५ रोजी पोलीस स्टेशन डाबकी रोड येथील पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण तसेच त्यांचे सोबत त्यांचा स्टॉफ असे पो स्टे डाबकी रोड परीसरात पेट्रोलींग करीत असतांना एएसआय दिपक तायडे यांना गुप्तबातमीदार यांचे कडुन माहिती मिळाली की, एक इसम गोरोबा काका मंदीराचे कमानीजवळ त्याचे हातामध्ये पांढरे रंगाचे बोरी घेवुन त्यातुन गुटख्याची विक्री करीता वाहतुक करीत आहे, अशा खात्रीलायक बातमीवरुन दोन पंचाना बोलावुन पंचासमक्ष सदर ठिकाणी जावुन संशयीत इसम नामे आशिष हरीशचंद्र वासेकर रा. डाबकी रोड अकोला यास ताब्यात घेवुन त्यास पंचासमक्ष विचारपूस करुन त्यांचे ताब्यातुन त्याने विक्री करीता जवळ बाळगलेला व मानवी आरोग्यास हानीकारक असलेला गुटखा ज्यामध्ये विमल पान मसाला, व्ही-१ तंबाखु, मस्तानी, बाहुबली गुटखा, आरसीबी पान मसाला अशा नमुद कंपनीचे गुटखा पॅकेट एकुण किंमत ४२,०३०/रु चा मुददेमाल नमुद इसमाकडुन जप्त करण्यात आला असुन नमुद इसमाने मानवी आरोग्यास हानीकारक तसेच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला मुददेमाल विक्री करीता जवळ बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे विरुध्द पोलीस स्टेशन डाबकी रोड, अकोला येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदरचे गुन्हयामध्ये आरोपी यास तात्काळ अटक करण्यात आली आहे.ऑपरेशन प्रहार संकल्पने अंतर्गत सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधिक्षक श्री रेडडी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील साहेब, ठाणेदार श्री. दिपक कोळी पो.स्टे. डाबकी रोड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि अनिल चव्हाण, एएसआय दिपक तायडे, पोहेकों पुंडे, पोहेकॉ इंगळे, नापोकों राजेश ठाकुर, पोकों मंगेश गिते, पोकों गजानन धोंगडे सर्व पो.स्टे. डाबकी रोड अकोला यांनी केली.







